Sheep Attack Girl Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video : मेंढ्यासोबत पंगा घेणं तरुणीला पडलं महागात; VIDEO पाहून हसू आवरणार नाही

तरुणीचे हे कृत पाहून मेंढा चांगलाच बिथरतो

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : सोशल मीडियाला (Social Media) व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. दररोज नवनवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर तर काही हिंसक असतात. तसं पाहता कोणताही पशु किंवा प्राणी मनुष्यावर हल्ला करता नाही. मात्र, त्याला जर राग आला तर तो आपलं हिंसक रूप दाखवतो. असाच एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Sheep Attack Girl Viral Video)

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक तरुणी विनाकारण मेंढ्याला डिवचण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर हा मेंढा हिंसक रुप धारण करतो. आपल्यासमोर उभ्या असलेल्या तरुणीला तो धडक देतो. मेंढ्याने दिलेली धडक इतकी जोरदार असते, की या धडकेत तरुणी चक्क जमिनीवर कोसळते.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ही मेंढ्यांच्या गोठ्यात शिरताना दिसत आहे. या तरुणीसोबत एक तरुण सुद्धा आहे. त्याचवेळी गोठ्यात असलेला एक मेंढा या तरुणीकडे येतो. मेंढ्याला पाहून ही तरुणी त्याला हाकलण्याचा प्रयत्न करते तसेच त्याच्यावर हातही उगारते. (Girls Funny Viral Video)

तरुणीचे हे कृत पाहून मेंढा चांगलाच बिथरतो आणि तिच्यावर अटॅक करतो. मेंढ्याच्या एका धडकेत तरुणी थेट जमिनीवर कोसळते. तरुणीच्या कृत्याचा मेंढ्याने तिला एक प्रकारे धडा शिकवला, असे व्हिडिओत पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ जुना असला तरी, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नेटिझन्स व्हिडिओ पाहून वेगवेगळ्या प्रकारे रिअॅक्शन देत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT