CCTV footage captures a tragic road accident in Andhra Pradesh where a scooter was crushed by a bus — the shocking video has gone viral online.  saam tv
देश विदेश

भीषण अपघात; एका सेकंदात स्कुटीचा चक्काचूर, भयानक अपघाताची घटना CCTV मध्ये कैद |Video Viral

Andhra Pradesh Road Accident CCTV Footage: आंध्र प्रदेशमध्ये एका स्कुटी चालक बसच्या चाकाखाली चिरडला गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Bharat Jadhav
  • आंध्र प्रदेशमध्ये बस आणि स्कुटीचा भीषण अपघात झालाय.

  • स्कुटी चालकाचा जागीच मृत्यू

  • अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आंध्र प्रदेशमध्ये एक भीषण अपघात घडलाय. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये स्कूटर चालक दिसतोय. तो रस्त्यावरून जाताना दिसतोय, त्याचवेळी पाठीमागून जाणाऱ्या बसने टक्कर दिली. त्यानंतर स्कुटी चालक बसखाली आला. स्कूटर आणि बस एकाच दिशेने जात होते. त्यावेळी अचानक बसचा काही भाग स्कूटरला लागला.

त्यामुळे स्कूटर चालकाचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. त्यानंतर तो बस खाली आला. पापणी हालण्याच्या वेळात ही घटना घडली. त्यामुळे या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करता आला नाही. ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

अपघात झाल्यानंतर तेथील लोक घटनास्थळी धावत आले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बसच्या चाकाखाली चिरडल्या गेल्यानं त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी तात्काळ पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

शहरातील एका वर्दळीच्या भागात हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. बस चालक वेगात होता. बस चालक स्कुटीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच प्रयत्नात अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कारची डंपरला धडक, इंजिनचा चक्काचूर झाल्यानंतर कारने पेट घेतला

पुणे जिल्ह्याच्या मुळशी तालुक्यातील भुकुम येथे भीषण अपघात घडला. एका डंपरला चारचाकी कारची जोरदार धडक बसली. या घटनेमध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारच्या पुढच्या भागाला आग लागल्याचेही म्हटले जात आहे. हा अपघात पुणे-कोलाड रस्त्यावर घडला. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-कोलाड रस्त्यावर चारचाकी कारची डंपरला धडक झाली. डंपरला कार आदळल्यानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण कारचालकाच्या छातीला मार लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती जवळ आग लागल्याची घटना

दिवाळी अन् छठपूजेसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रात 'या' ठिकाणांहून सुटणार १७०२ विशेष गाड्या

Firecracker Safety Guide: फटाके फोडताना काळजी घ्या! डॉ. अनुपम टाकळकर यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना|VIDEO

Viral Fever: दिवाळीनंतर वायरल तापाचा धोका वाढतो? जाणून घ्या कारण

Raigad Crime: सोशल मीडियावरच्या प्रेमासाठी तोडली सात वचनं; प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने काढला पतीचा काटा

SCROLL FOR NEXT