Andhra Pradesh Latest News
Andhra Pradesh Latest News ANI
देश विदेश

Andhra Pradesh : आंध्रप्रदेशात मोठी दुर्घटना! माजी मुख्यमंत्र्यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ७ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

साम टिव्ही ब्युरो

Andhra Pradesh Chandrababu Naidu Rally : आंध्रप्रदेशातून एक भयंकर घटना समोर आली आहे. माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या सभेत चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. या घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, नेल्लोर जिल्ह्यातील कुंडुकूर येथे ही घटना घडली आहे. चंद्रबाबू नायडू यांच्या रोड शो दरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये झालेली घटना स्पष्ट दिसत आहे. घटनास्थळी पोलिसांसह आरोग्य विभागाचे डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे बुधवारी संध्याकाळी कंदुकूरमध्ये रोड शो करत होते. त्यांचा ताफा गुडम कालवा ओलांडत असताना मोठी गर्दी झाली. या गर्दीतून अनेक कामगार कालव्यात पडले. त्यामुळे तीन जणांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. तर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे, इतर 6 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

अपघातानंतर लगेचच नायडू यांनी आपली बैठक रद्द केली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. जखमींवर चांगले उपचार व्हावेत, अशी विनंतीही त्यांनी पक्षाच्या नेत्यांना केली आहे. चंद्राबाबू नायडू 28 ते 30 डिसेंबर दरम्यान नेल्लोर जिल्ह्यातील विविध भागांच्या दौऱ्यावर आहेत.

यादरम्यान ते जिल्ह्यातील कंडुकूर, कावली आणि कोवूर मतदारसंघातील विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. नुकतेच कंडुकूर येथे मांडौस चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. यादरम्यान ते विविध भागात रोड शोही करत आहेत.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert: राज्यात आजही पावसाचा इशारा, तब्बल १७ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस, वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya : या राशींच्या मनासारख्या घटना घडतील, प्रलंबित कामे होतील पूर्ण; वाचा संपूर्ण राशिभविष्य

Horoscope Today : 'या' राशीच्या लोकांचं भाग्य सोन्यासारखं चमकणार

Maharashtra Election: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मतदानाची का होतेय चर्चा?

Dindori Loksabha Election: दिवस मावळला तरी मतदार येईना; एकही मत न देणारं मेव्हणं गाव आलं चर्चेत

SCROLL FOR NEXT