YS Sharmila Reddy Saam TV
देश विदेश

YS Sharmila Reddy : मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला अटकेची भीती, काँग्रेस कार्यालयात काढली रात्र

प्रविण वाकचौरे

YS Sharmila Reddy :

आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहीण वायएस शर्मिला रेड्डी यांना नजरकैदेत ठेवलं जाऊ शकतं अशी भीती आहे. त्यामुळे अटक टाळण्यासाठी शर्मिला रेड्डी यांनी संपूर्ण रात्र काँग्रेस कार्यालयात काढली. त्या काँग्रेस ऑफिसमध्ये झोपल्या असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. संपूर्ण रात्र त्यांनी तिथेच काढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वायएस शर्मिला यांनी आरोप केला की 'चलो सचिवालय' आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील काँग्रेस नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अनेकांना घरी नजरकैदेत ठेवले आहे. त्यांच्यावर देखील अशी कारवाई केली जाऊ शकते.

बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत काँग्रेसने विजयवाडा येथे चलो सचिवालय या आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेसचं हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत, असंही रेड्डी यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

सरकारने तरुणांचे प्रश्न सोडवावेत, अशी काँग्रेसची मागणी आहे. मागील पाच वर्षात सरकारने तरुणांच्या, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जगनमोहन रेड्डी सरकारचं हे अपयश अधोरेखित करण्यासाठी काँग्रेसचं हे आंदोलन आहे. मात्र सरकारने या आंदोलनाचा धसका घेतल्याने ते मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

काय म्हणाल्या शर्मिला रेड्डी?

आम्ही बेरोजगारांच्या वतीने आंदोलन पुकारले म्हणून आम्हाला नजरकैदेत ठेवण्याचा प्रयत्न कराल का? लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार नाही का? एक महिला म्हणून मला पोलिसांपासून दूर राहावे लागले आणि नजरकैदेपासून दूर राहण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात रात्र काढावी लागली, ही लाजिरवाणी आहे.

आम्ही दहशतवादी आहोत का? आम्हाला रोखण्याचा प्रयत्न का करत आहात. म्हणजेच सरकार आम्हाला घाबरलं आहे. सरकार सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने किती रोखले तरी बेरोजगारांच्या वतीने आमचा संघर्ष थांबणार नाही, असं देखील शर्मिला रेड्डी यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wheat Bugs : गव्हासह डब्ब्यात 'या' गोष्टी मिक्स केल्यास लागणार नाहीत किडे

PM Narendra Modi : मोदींचा महाराष्ट्र दौरा; वर्ध्यातून संबोधित करणार

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT