Sri City boiler explosion latest news Saam TV
देश विदेश

Boiler Explosion : कारखान्यात अचानक बॉयलर फुटला; ५ जणांचा जागीच मृत्यू, अनेक कामगार अडकल्याची भीती?

Sri City boiler explosion latest news : आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील श्री सिटी परिसरातील TIL Healthcare कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट झाला. प्राथमिक वृत्तानुसार ५ कामगारांचा मृत्यू झाला असून १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू आहे.

Namdeo Kumbhar

Tirupati Factory Blast Death Toll : आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील श्री सिटी परिसरातील एका कंपनीमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारखान्यात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना अचानक हा मोठा स्फोट झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात ५ मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेला स्फोटामुळे सगळीकडे भितीचे वातावऱण आहे. दुर्घटनेमुळे अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याशिवाय काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. कारखान्यात अचानक स्फोट का झाला? याचा शोध घेतला जात आहे. १० हून अधिक कामगार गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. स्फोटानंतर कारखान्यात अनेक कामगार अडकल्याचा अंदाज आहे.

कामगारांचे दैनंदिन काम सुरू असताना अचानक बॉयलरमध्ये प्रचंड दाबाने स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की आसपासचा परिसर हादरून गेला. स्फोटामुळे कारखान्याच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले असून काही कामगार आत अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशामक दल आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना टिल हेल्थ केअरमध्ये मध्यरात्री झाली. कर्मचारी काम करत असताना एका बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली. स्फोटाच्या वेळी कर्तव्यावर असलेले अनेक कामगार कारखान्यात अडकले असावेत असा अंदाज आहे. बचाव पथकांनी घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केले आहे. अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता आहे. अशा लोकांना शोधून बाहेर काढण्याचे काम करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लान, १०० विद्यामान आमदारांचे पत्ते कट होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये कधी जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: दादर-शिवाजी पार्क परिसरात CJP आंदोलकांवर पोलिसांची कारवाई

LPG Cylinder : दिवाळीपूर्वी या सरकारचा मोठा निर्णय! १ गॅस सिलिंडर मिळणार फ्री; काय आहेत नियम?

Sleep Problems: तुमची झोप नीट होत नाहीये? रोजच्या या ५ सवयींमुळं उद्ध्वस्त होतेय रात्रीची विश्रांती

SCROLL FOR NEXT