उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग! चक्क Pressure cooker सोबतच केलं लग्न Saam Tv
देश विदेश

उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग! चक्क Pressure cooker सोबतच केलं लग्न

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण स्वयंपाक करणाऱ्या कुकरशी लग्न करत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : हे जग खूपच विचित्र लोकांनी भरले आहे. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण स्वयंपाक करणाऱ्या कुकरशी लग्न Marriage करत आहे. हे तुम्हाला विचित्र वाटणार आहे, पण हे खरे आहे. लग्नानंतर, तरुणाने कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर फोटो टाकला आहे. पण नंतर प्रकरण काही वेगळेच निघाल आहे. हा तरुण इंडोनेशियाचा Indonesia रहिवासी आहे. त्याचे नाव काहरोल अनाम आहे.

त्याने ट्विटरवर काही फोटोज शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो पांढऱ्या लग्नाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. शेजारी राईस कुकर ठेवण्यात आला आहे. ज्याला वधूचा पोशाख घातला आहे. शिवाय, अनाम कुकर बरोबर अशा पोझमध्ये फोटो काढत आहे. जणू ती मुलगी आहे. एका फोटोमध्ये, तो कुकरचे चुंबन घेत आहे. तर जसे सामान्यतः वधू आणि वर लग्नात करतात. सुरुवातीला लोक त्याला एक विनोद समजत होते.

हे देखील पहा-

पण काही वेळानंतर अनामने दुसरा फोटो टाकला. ज्यामध्ये तो कायदेशीर औपचारिकता पूर्ण करताना दिसत आहे. या बरोबरच त्याने कुकरला बाजूला ठेवून काही कागदपत्रांवर स्वाक्षरी देखील केली आहे. अनामने सांगितले की हा विनोद नाही, पण तो सर्व काही कायदेशीररित्या करत आहे. जेव्हा त्या व्यक्तीने ट्विटर व्यतिरिक्त फेसबुकवर देखील फोटो पोस्ट केले आहेत.

त्याने तिथे लिहिले की पांढरा, शांत, परिपूर्ण. जास्त बोलत नाही, स्वयंपाक करताना चांगले, एक स्वप्न सत्यात उतरते. तुझ्याशिवाय माझे भात बनणार नाही. त्याचे फोटो सोशल मीडियावर खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. ज्यावर ४४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या व्यतिरिक्त ते १३ हजार पेक्षा जास्त वेळा रिट्विट करण्यात आले आहे. लग्नाचा फोटो पोस्ट केल्यानंतर ४ दिवसांनी अनामने एक नवीन घोषणा करण्यात आली आहे.

तो म्हणाला की मी माझी पत्नी 'कुकर' ला घटस्फोट Divorce देत आहे. त्यामागचे कारणही त्याने सांगितले. अनामने लिहिले की ती तांदूळ बनवण्यात चांगली आहे. पण ती इतर कोणतीही डिश बनवत नाही. यामुळे मी त्याला घटस्फोट देत आहे. दुसरीकडे, लोक सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा खूप आनंद घेत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले की मी एअर फ्रायरशी लग्न करण्याचा विचार करत आहे.

तर दुसऱ्याने कमेंट केली की हा मुलगा हुशार आहे. पण तो हनिमून कसा साजरा करणार आहे. त्याचवेळी, एका व्यक्तीने विचारले की या व्यक्तीने त्याच्या राईस कुकरशी लग्न केले आहे की दुसरे कोणी? अशा प्रकारे लोकांनी यावर मजेदार कमेंटचा वर्षाव केले आहेत. नंतर हे उघड झाले आहे की अनामने हे सर्व विनोदाने केले होते. तो सोशल मीडियावर त्याच्या मजेदार सामग्रीसाठी ओळखला जातो.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT