अमृतसरमध्ये कोसळलेलं ड्रोन पाकिस्तानचे? भारतीय हवाई दलाचा खुलासा  Saam Tv
देश विदेश

अमृतसरमध्ये कोसळलेलं ड्रोन पाकिस्तानचे? भारतीय हवाई दलाचा खुलासा

अमृतसर येथील एका शेतामध्ये कोसळलेला ड्रोन...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चंदीगड : अमृतसर मधील एका शेतात टिफिन बॉम्ब आणि अन्य काही स्फोटकं आढळल्यामुळे अमृतसर या ठिकाणी एका शेतात ड्रोन कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायंकाळी १ मानवरहित ड्रोन शेतात कोसळल्यानंतर, आजूबाजूच्या जवळपास १२ गावात दहशतीचे वातावरण पसरले आहे.

अमृतसर जवळच असणाऱ्या मालो गिल गावात हे ड्रोन कोसळले आहे. यानंतर जवळपास ५०० हून अधिक ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती. अमृतसर या ठिकाणी एका शेतात टिफिन बॉम्ब आढळल्यावर पंजाब मधील सीमा पोलीस हाय अलर्टवर आहे. गुरदासपूरचे एसएसपी नानक सिंह त्यांच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे.

हे देखील पहा-

दरम्यान, कलानौर उपविभागातील एका गावात एक मोठे हेलिकॉप्टर १०-१५ मिनिटं आकाशात घिरट्या घालून, खाली पडले असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना समोर येताच जवळ पासच्या गावात असंख्य लोकं घाबरुन गेले होते. द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्ताच्या माहितीनुसार, संबंधित ड्रोन भारतीय हवाई दलाचे असल्याचे समोर आले आहे.

जम्मूहून भारतीय हवाई दल एका रिमोटद्वारे या ड्रोनला नियंत्रित करत असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुदासपूरचे एसएसपी आपल्या टीमसह मालो गिल गावात पोहोचल्यावर, त्यांना ही कळले की संबंधित ड्रोन पाकिस्तानी नसून, तर भारतीय हवाई दलाचे आहे. या ड्रोनवर नियंत्रण गमावल असल्याने हा अपघात घडला आहे.

हा अपघातग्रस्त ड्रोन बघण्यासाठी याठिकाणी जवळपास ५०० हून अधिक जणांनी गर्दी केली होती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना खूपच प्रयत्न करावा लागला आहे. यानंतर, लोकांमध्ये पसरलेली अफवा दूर करण्याकरिता ६ पीसीआर वाहने आणि मोटार सायकलीवर गावांगावात जाऊन पोलिसांनी लोकांना अचूक अशी याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानंतर गावातील दहशतीचे वातावरण निवळले आहे. अवजड शस्त्र वाहून नेण्याची क्षमता नसल्याने हा ड्रोन अपघात झाला असावा, अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT