Amritpal Singh  Saam Tv
देश विदेश

Amritpal Singh Arrested: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगला अटक; दुब्रुगढ जेलमध्ये होणार रवानगी

Amritpal Singh Surrender: अमृतपाल तब्बल ३६ दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे.

Shivani Tichkule

Amritpal Singh Arrested in Moga : गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अमृतपाल सिंग याला पंजाबच्या मोगा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

अमृतपाल गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. अमृतपालला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांकडून देशभरात ऑपरेशन राबवण्यात आले होते. अखेर ३६ दिवसांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. (Latest Marathi News)

अमृतपाल याच्यावर एनएसए अंतर्गत कारवाई करून त्याला आसामच्या डिब्रूगढ जिल्ह्यात रवाना करण्याची तयारी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमृतपाल सिंगने पंजाबमधील (Punjab) मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

अमृतपालने मोगा येथील रोडेवाल गुरुद्वारात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले, तेथून त्याला अमृतसरला नेण्यात आले, गुरुद्वारात पोहोचल्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना आपण गुरुद्वारा असल्याची माहिती दिली. (Breaking Marathi News)

अमृतपालवर शांतता भंग करणे, हिंसाचार करणे असे अनेक आरोप आहेत. सध्या आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला ताब्यात घेतले आहे. 18 मार्च रोजी पंजाब पोलिसांनी (Police) अमृतपाल सिंग आणि त्याच्या 'वारीस पंजाब दे' या संस्थेवर कारवाई करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तो फरार होता.

आता त्याला आसामच्या दिब्रुगड तुरुंगात हलवण्यात येणार आहे, जिथे पापलप्रीत सिंगसह त्याचे आठ साथीदार आधीच बंदिस्त आहे. याबाबत पंजाब पोलिसांनी एका ट्विटमध्ये सांगितले की, अमृतपाल सिंगला पंजाबच्या मोगा येथे अटक (Arrest) करण्यात आली असून, नागरिकांना शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आजी-माजी आमदाराचा वाद विकोपाला, थेट शिवीगाळ अन्...; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: शाळकरी विद्यार्थ्यावर ऑटो चालकाचा चाकू हल्ला

Strawberry Benefits: हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याचे जबरदस्त फायदे

Actress Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोडलं तिसरं लग्न; आता राहणार सिंगल, तरीही म्हणते- माझ्या आयुष्यातला सुंदर आणि सुखी काळ...

Kalyan : कल्याणचा स्कायवॉक फेरीवाल्यांनी गिळला; प्रशासन मूग गिळून गप्प, कारवाई करणार की नाही?

SCROLL FOR NEXT