Amit Shah Saam Tv
देश विदेश

2029 मध्ये केंद्रात कोणाचे सरकार होणार स्थापन? अमित शहा यांनी केली भविष्यवाणी

Amit Shah on Lok Sabha Election 2029: एनडीए सरकार फक्त आपला हा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. तर 2029 मध्येही सरकार स्थापन करेल, असं अमित शहा म्हणाले आहेत.

Saam Tv

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी राष्ट्रीय एनडीएबाबत मोठा दावा केला. ते म्हणाले की, ही एनडीए सरकार फक्त आपला हा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. तर 2029 मध्येही सरकार स्थापन करेल. चंदीगडमधील मनीमाजरा येथे एका कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले आहेत की, '''विरोधकांना जे म्हणायचे आहे ते बोलू शकतात, मात्र याची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, काळजी करू नका. 2029 मध्येही फक्त एनडीएचीच सत्ता येईल, फक्त नरेंद्र मोदीच येतील.''

अमित शहा म्हणाले, ''विरोधकांना वाटते की, त्यांनी काही प्रमाणात यश मिळवून निवडणुका जिंकल्या आहेत. गेल्या तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला जितक्या जागा मिळाल्या आहेत, त्यापेक्षा जास्त जागा या निवडणुकीत भाजपला मिळाल्या आहेत, हे त्यांना माहीत नाही. भाजपकडे त्यांच्या संपूर्ण आघाडीपेक्षा जास्त जागा आहेत.''

अमित शहा म्हणाले, ''मी विरोधी पक्षांना आश्वस्त करू इच्छितो की, हे सरकार फक्त 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही, तर पुढील कार्यकाळही या सरकारचा असेल. विरोधी पक्षाच्या बाकांवर बसण्याची तयारी ठेवा आणि विरोधी पक्षात प्रभावीपणे काम करायला शिका.''

दरम्यान, आज अमित शहा यांनी चंदीगडमधील मणिमाजरा येथे एका प्रकल्पाचे उद्घाटन केले. पंजाबचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक गुलाब चंद कटारिया यावेळी उपस्थित होते. एकूण 75 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा मणिमाजरा येथील 1 लाखाहून अधिक रहिवाशांना फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

SCROLL FOR NEXT