Amit Shah on Manipur Clashes Update  saam tv
देश विदेश

Amit Shah News : अमित शहांचा कडक शब्दांत इशारा; म्हणाले, मणिपूरमध्ये हिंसा घडवून आणणाऱ्यांना सोडणार नाही!

Manipur Clashes News Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मणिपूर हिंसाचाराची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Nandkumar Joshi

Manipur Clashes News Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मणिपूर हिंसाचाराच्या चौकशीची घोषणा केली. मणिपूर हिंसाचाराची चौकशी न्यायालयीन आयोगामार्फत केली जाईल. तर हिंसाचाराशी संबंधित सहा घटनांची चौकशी सीबीआयमार्फत केली जाईल, असे अमित शहा यांनी सांगितले. हिंसा घडवून आणणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशारा अमित शहांनी यावेळी दिला.  (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) हे सध्या मणिपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हिंसाचाराच्या घटनेची चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा केली. हायकोर्टाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील न्यायालयीन आयोगामार्फत ही चौकशी केली जाईल. याशिवाय या हिंसाचाराशी संबंधित सहा घटनांची चौकशी सीबीआय करेल, असे अमित शहा यांनी सांगितले.

मणिपूर हिंसाचारात (Manipur Clashes) जीव गमावलेल्या व्यक्तींच्या पीडित कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, अशी घोषणाही यावेळी अमित शहा यांनी केली.

मणिपूर दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी इंफाळमध्ये पत्रकार परिषद घेत अमित शहांनी हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य केले. गैरसमजातून हिंसा झाली आहे. राज्य विकासाच्या मार्गावर जात आहे. गेल्या सहा वर्षांत विकासाची कामे खूप झाली आहेत.

मणिपूरमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून हिंसाचार मुक्तीच्या दिशेने जात आहे. हिंसेत कुणाचाही जीव गेला तरी, ते दुःखद आहे. गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या भागांत जाऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला आहे, असे अमित शहा यांनी सांगितले.

हिंसा घडवून आणणाऱ्यांना सोडणार नाही- शहा

हिंसा घडवून आणणाऱ्यांना यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी निर्वाणीचा इशारा दिला. अशा लोकांना अजिबात सोडणार नाही, असे ते म्हणाले. अफवांवर विश्वास ठेवू नका. शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी केलं. सर्व नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवल्या जातील. वैद्यकीय असो की धान्य पुरवठा सरकार आवश्यक ती पावले उचलत आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: बीड तालुक्यातील श्री क्षेत्र चाकरवाडी येथे नारळ-पेढा विक्री करणाऱ्या महिलांमध्ये तुंबळ हाणामारी

ओट्स की दालिया? वजन कमी करण्यासाठी नाश्त्याला काय खावे?

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसाचा हाहाकार, एकाच कुटुंबातील तिघांसह ६ जणांचा मृत्यू

Terror Attack : जम्मू- काश्मीरमध्ये मोठा दहशवादी हल्ला, नाव विचारून गोळ्या झाडल्या; 2 जणांचा मृत्यू

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अवघ्या वर्षभरातच गाशा गुंडाळला, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT