New York Diwali Holiday Saam Tv
देश विदेश

New York Diwali Holiday: अमेरिकेतल्या न्ययॉर्कमध्ये भारतीयांची 'दिवाळी', सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

New York Diwali 2023 : महापौर एरिक अ‍ॅडम्स (Mayor Eric Adams) यांनी सोमवारी ही घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व भारतीयांकडून स्वागत करण्यात आले आहे.

Priya More

NYC Diwali School Holiday: अमेरिकेतल्या (America) न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. आता याठिकाणी राहणाऱ्या भारतीयांची दिवाळी गोड होणार आहे. भारतीयांच्या संस्कृतीला महत्त्व देत न्यूयॉर्क प्रशासनाने शाळांच्या सार्वजनिक सुट्टीच्या यादीत दिवाळीचा (New York Diwali Holiday) समावेश केला आहे.

या शहराचे महापौर एरिक अ‍ॅडम्स (Mayor Eric Adams) यांनी सोमवारी ही घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व भारतीयांकडून स्वागत करण्यात आले आहे. शहरातील दक्षिण आशियाई आणि भारतीय कॅरेबियन समुदायाचा आकार लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण यावर्षी दिवाळी (Diwali 2023) रविवारी आली आहे.

न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स यांनी सोमवारी दिवाळीच्या सुट्टीबाबतची माहिती ट्वीट करत सांगितली.त्यांनी या ट्विटमध्ये असे सांगितले की, 'आतापासून दिव्यांचा सण दिवाळीला न्यूयॉर्क शहरातील शाळांना सुट्टी असेल. विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार यांच्यासह इतर समाजाच्या नेत्यांनी मला दिवाळीच्या सुट्टीच्या निर्णयात मदत केली. मला माहिती आहे की ही वर्षाची सुरुवात आहे. तरी देखील सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा.'

महापौर अ‍ॅडम्स यांनी पुढे सांगितले की, 'आता नकोसे वाटण्याची गरज नाही. तुम्ही या शहराचा एक भाग आहात. तुम्हाला बाहेरचे मानले जाणार नाही. न्यूयॉर्क सर्वांसाठी आहे. तुम्ही कुठून आलात याची आम्हाला पर्वा नाही.' तर न्यूयॉर्क विधानसभा सदस्य जेनिफर राजकुमार यांनी देखील ट्वीट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. नवीन कायद्यासाठी महापौरांसह लढा देणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, या विधेयकावर राज्यपाल कॅथी हॉचुल यांची स्वाक्षरी होणे अद्याप बाकी आहे.पण महापौरांनी सांगितले की, मला विश्वास आहे की राज्यपाल या विधेयकावर स्वाक्षरी करतील. कॅलेंडरवर दिवाळीची सुट्टी ब्रुकलिन-क्वीन्स डेची जागा घेईल. मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्कच्या शाळांमध्ये 2015 पासून ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अधासाठी सुट्टी दिली जात ​​आहे.

दरम्यान, दिवाळी हा भारतीयांसाठी महत्वाचा सण मानला जातो. भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आता जगातील अनेक शहरांमध्ये दिवाळीची सुट्टी द्यायला सुरुवात झाली आहे. या यादीमध्ये आता अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहराचे नाव सामिल झाले आहे. न्यूयॉर्कमध्ये पब्लिक स्कूलमध्ये यापुढे दिवाळीची सुट्टी दिली जाणार आहे. न्यूयॉर्क शहारात वाढत्या भारतीय नागरिकांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. न्यूयॉर्क शहरात हिंदू, शीख, जैन आणि काही बौद्ध धर्मातील जवळपास 2 लाखांपेक्षा जास्त भारतीय दिवाळी साजरी करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ते एक वर्षभरापूर्वीचं वक्तव्य अन् सोने-चांदीचा भाव गडगडला; PM नरेंद्र मोदींनी सांगितलं नेमकं कारण

बारामतीत गोळीबाराचा थरार! आलिशान कारमधून आलेल्या उद्योजकावर धडाधड गोळ्या झाडल्या

कुठे घोड्यांची शर्यत, कुठे विदेशी मासे; पुण्यातील पेटोपियात नेमकं काय सुरू आहे? VIDEO

प्रसिद्ध मॉडेल बलात्कार प्रकरणात मुंबईतील उद्योजकाला दिलासा; न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT