Accident NY Post
देश विदेश

America: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत दहशतवादी हल्ला; १० जणांचा मृत्यू

America Attack: नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या नागरिकांच्या गर्दीवर एक ट्रक घुसला. अपघातामध्ये अनेकजण जखमी झाले. हा प्रकार अमेरिकेच्या न्यू ऑरलियन्समध्ये घडला आहे.

Saam Tv

America: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अमेरिकमध्ये मोठा अपघात झाला आहे. न्यू ऑरलियन्समधील बोर्बन स्ट्रीटवरच्या गर्दीत एकाने ट्रक घुसवला. वेगाने आलेल्या ट्रकच्या खाली अनेकजण चिरडले गेले. त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यू ऑरलियन्सच्या महापौर लटोया कँटरेल यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे विधान केले आहे.

न्यू ऑरलियन्सच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे ३.१५ च्या सुमारास घडली. परिसरात न्यू इयर सेलिब्रेशन संपत आले होते. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रस्त्यावर गर्दी झाली होती. या गर्दीत एक ट्रक घुसला आणि त्याने गर्दीतील लोकांना चिरडले. यामध्ये १० नागरिकांचा मृत्यू झाला, तर ३० नागरिक जखमी झाले आहेत.

ट्रकचा अपघात झाल्यानंतर त्याच्या चालकाने गोळीबार करायचा प्रयत्न केला. त्याला स्थानिक पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या गोळीबारामध्ये दोन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले. त्यांना लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. ते आता सुखरुप असल्याचेही पोलिसांनी माध्यमांना सांगितले.

पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात घडला. अमेरिकेतील न्यू ऑरलियन्सचा परिसर नाइट लाइफसाठी लोकप्रिय आहे. त्यामुळे नववर्षाच्या स्वागतासाठी असंख्य लोक जमले होते. तेव्हाच हा भीषण अपघात झाला. ही घटना घातपाताचा प्रयत्न असल्याची शक्यता न्यू ऑरलियन्सच्या महापौर लटोया कँटरेल यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी हा अपघात 'दहशतवादी हल्ला' आहे असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT