Firing In USA On Independenc Day  Saam Tv
देश विदेश

अमेरिकेत स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये गोळीबार; ६ जणांचा मृत्यू, ५७ जण जखमी

या गोळीबारात ७५ जण जखमी झाले, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

साम वृत्तसंथा

वाशिंग्टन: ४ जुलै अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी शिकागोमध्ये स्वातंत्र्य दिन परेड दरम्यान गोळीबार झाला. शिकागोच्या उपनगरातील इलिनॉय राज्यातील हायलँड पार्कमध्ये ही घटना घडली. या हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू झाला. तर ५७ जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

परेड सकाळी १० वाजता सुरू झाले. पण परेड गोळीबारानंतर थांबवण्यात आले. पेरड पाहण्यासाठी शेकडो लोकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने दुकानाच्या छतावरून अंदाधुंद गोळीबार केला. परिसराची नाकाबंदी करून हल्लेखोराचा शोध सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनीही या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. 'या निर्दयी हिंसाचाराने मला धक्का बसला आहे.' असं बिडेन यांनी म्हटले आहे.

हल्लेखोराने छतावरून परेडमधील सहभागींवर गोळीबार केला. रायफल जप्त करण्यात आली आहे. मात्र, त्याने कोणत्या इमारतीच्या छतावरून गोळीबार केला याचा अजुनही शोध घेतला जात आहे. पोलिसांनी संशयित हल्लेखोराचा फोटो जारी केला आहे. रॉबर्ट ई क्रेमो उर्फ ​​बॉबी असे संशयिताचे नाव आहे. हल्लेखोर १८ ते २० वयोगटातील तरुण आहे, अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इलिनॉयमध्ये ४ जुलैच्या परेडमध्ये २५ गोळ्या झाडल्या. या व्हिडिओत दिसत आहे. तर या गोळीबीराने एकच गोंधळ निर्माण झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fasting Tips : केळीचे चिप्स कि बटाट्याचे चिप्स? कोणते चिप्स उपवासासाठी आहेत हेल्दी?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवक यांचा पुणे महापालिकेच्या पाऱ्यांवर ठिय्या

घराच्या प्रवेशद्वारावर 'या' तीन गोष्टी ठेवल्यानं दूर होईल आर्थिक चणचण; घरात येईल समुद्धी

Plane Crash: उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांत विमान कोसळलं, ८ जणांचा मृत्यू

EPFO : मालक PF कापतो का? 2 मिनिटांत तपासा, वाचा सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT