US judge Attacked Saam Tv
देश विदेश

US judge Attacked: महिला न्यायाधीशांच्या निर्णयाने आरोपी संतापला, 'स्पायडरमॅन'सारखी उडी घेत केला हल्ला; पाहा VIDEO

Viral Video: अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील नेवाडा राज्यातील लास वेगास शहरातील न्यायालयात एका आरोपीने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान महिला न्यायाधीशावर उडी मारून हल्ला केल्याने गोंधळ उडाला आहे.

Satish Kengar

US judge Attacked CCTV VIDEO:

अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील नेवाडा राज्यातील लास वेगास शहरातील न्यायालयात एका आरोपीने एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान महिला न्यायाधीशावर उडी मारून हल्ला केल्याने गोंधळ उडाला आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे की, जेव्हा महिला न्यायाधीशांनी आरोपीच्या विरोधात निकाल देण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने वेगाने धावत घेत महिला न्यायाधीशांच्या टेबलावर उडी मारली आणि त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यात न्यायाधीशांना किरकोळ दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात त्यांचे संरक्षण करणारा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव सुरू झाला. सुरक्षारक्षकाच्या खांद्यालाही दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना नवीन वर्षात 3 जानेवारी रोजी घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

USA Today या अमेरिकन वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डिओब्रा रेडन हा लास वेगासचा रहिवासी असून तो एका गंभीर गुन्ह्यात आरोपी होता. तो त्याच खटल्यात हजर होता, ज्यावर न्यायाधीश मेरी के. होल्थस सुनावणीनंतर निकाल देत होत्या. न्यायाधीशांनी रेडनला दोषी घोषित करताच आणि त्याला शिक्षा सुनावणार इतक्यात आरोपी धावत आला आणि त्याने त्यांच्यावर हल्ला केला. (Latest Marathi News)

कोर्टरूमच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आरोपी न्यायाधीशांच्या दिशेने धावत असतानाच न्यायाधीश मेरी होल्थसला धोका जाणवला आणि त्या आपल्या खुर्चीवरून उठल्या आणि मागे झाल्या. मात्र तितक्यात आरोपी टेबलावर चढला आणि त्यांच्या अंगावर उडी मारली.

या हल्ल्यात न्यायाधीश किरकोळ जखमी झाल्या आहेत. तर शेजारी उभ्या असलेल्या न्यायाधीशांच्या सुरक्षारक्षकाला गंभीर दुखापत झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, त्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रेडेनला पकडून तिथेच बेदम मारहाण केली आणि त्याला कोर्टरूमच्या बाहेर घेऊन गेले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT