अमेरिकेत भूकंप! अलास्काला बसला ८.२ रिश्टर स्केलचा हादरा Saam Tv
देश विदेश

अमेरिकेत भूकंप! अलास्काला बसला ८.२ रिश्टर स्केलचा हादरा

अमेरिकेमधील अलास्का पेनिनसुलात भूकंपाचा तीव्र मोठा धक्का जाणवला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेमधील America अलास्का Alaska पेनिनसुलात भूकंपाचा Earthquake तीव्र मोठा धक्का जाणवला आहे. यामुळे हादऱ्यानंतर लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.२ इतकी मोजली गेलेली आहे. भूकंपाने मोठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्यातरी कोणत्याच जीवितहानीचे वृत्त समोर आलेले नाही.

हे देखील पहा-

मात्र, समुद्र sea किनाऱ्यावर शहरे आणि गावांना त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला आहे. अमेरिका जिओलॉजिकल Geological सर्व्हेने रात्रीच्या ११ वाजून २५ मिनिटांनी ४६.७ किमी खाली भूकंपाच्या धक्क्यांची नोंद करण्यात आली आहे. यूएसजीएसच्या दिलेल्या माहितीनुसार कमीत- कमी २ धक्के यावेळी जाणवले आहेत. ६.२ आणि ५.६ रिश्टर स्केलचे हे धक्के बसले आहेत.

अलास्का पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये येतं आहेत. त्यामध्ये सीस्मिक अॅक्टिव्हीटी सक्रिय असतात. उत्तर अमेरिके मध्ये मार्च १९६४ मध्ये सर्वात मोठा भूकंप झालेला होता. त्याची तीव्रता ९.२ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. अँकोरेज, अलास्का खाडी, पश्चिम तटीय भाग आणि हवाई भागात मोठा धक्का बसलेला आहे. भूकंप आणि त्सुनामीमुळे २५० हून अधिक जणांना जीव गमवावा लागलेला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT