America-China Tariff War saam tv
देश विदेश

America-China Tariff War: अमेरिका-चीनमध्ये टॅरिफ वॉर; अमेरिकेचा चीनवर 104% आयातकर

Tariff War: चीन-अमेरिकेत टॅरिफयुद्ध पेटलंय. अमेरिकेला चीनने जशास तसं उत्तर दिलंय.. त्यामुळे हा युद्ध चांगलंच भडकलंय. मात्र त्याचा फटका अमेरिकेलाच बसणार आहे. तो नेमका कसा? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Snehil Shivaji

ट्रम्प सत्तेत आले आणि अमेरिका-चीनमधलं व्यापार युद्ध सुरु झालं असं म्हणावं लागेल. कारणं आपल्या नवीन कर धोरणावरुन ट्रम्प यांनी चीनची कोंडी केलीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर आता तब्बल १०४ टक्के आयात कर लावण्याचा मोठा निर्णय घेतलाय. आणि तडकाफडकी हा निर्णय अंमलातही आणलाय.

ट्रम्पच्या निर्णयला चीननं सडेतोड उत्तर देण्याची रणनीती आखलीय. चीननंही हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालण्याच्या हालचाली सुरू केल्याचं कळतंय. जर चीननं हॉलिवूड सिनेमांवर बंदी घातली तर अमेरिकेला कसा फटका बसणार ते पाहूयात.

अमेरिकेचा वार, चीनचा पलटवार

ट्रम्पचा चीनवर 104% आयात कर, चीनचं सडेतोड उत्तर

चीन हॉलिवूड सिनेमांवर बंदी घालण्याची शक्यता

चीनची बॉक्स ऑफिस कमाई 17.71 अब्ज डॉलर्स, हॉलिवूडचा वाटा 3.5 टक्के

2024मध्ये अमेरिकन चित्रपटांची चीनमध्ये 585 दशलक्ष डॉलर्सची कमाई

चीननं बंदी घातल्यास हॉलिवूडच्या चित्रपटांचं अब्जावधी डॉलर्सचं नुकसान?

याआधीचं अमेरिकेच्या या नव्या कर धोरणांनं जगभरातील शेअर बाजारांमध्ये भूकंप आणला. आणि आता चीनी उत्पादनांवर थेट 104 टक्के कर लावून ट्रम्प यांनी जागतिक अर्थव्यवस्थेत अस्थिरता आणली इतकं मात्र खरं. त्यामुळे अमेरिका आणि चीनमधलं हे व्यापारी युद्ध कोणत्या वळणावर जाईल, आणि यात भारताची काय भूमिका असेल याकडे आता संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT