An Air India flight from Delhi to Bengaluru suffered a tail strike while landing at Bengaluru airport. saamtv
देश विदेश

Air India Flight: एअर इंडियाच्या विमानाचा अपघात; लँडिंग करताना फ्लाइटचा मागील भाग धावपट्टीला धडकला

Air India Aircraft Hits Runway While Landing: बेंगळुरू विमानतळावर लँडिंगदरम्यान एअर इंडियाच्या विमानाचा मागील भाग धावपट्टीला धडकल्याने टेल स्ट्राइकची घटना घडली. या घटनेनंतर विमानाचे उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

Bharat Jadhav

  • दिल्ली-बेंगळुरू एअर इंडिया विमानाला लँडिंगदरम्यान अपघात.

  • विमानाचा मागील भाग धावपट्टीला धडकल्याने ‘टेल स्ट्राइक’ घटना.

  • विमानातील सर्व १७९ प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित.

दिल्लीहून बेंगळुरूला जाणारे एअर इंडियाचे विमानाचा लँडिंग करताना अपघात झाला आहे. धावपट्टीवर उतरताना विमानाचा मागील भाग जमिनीवर धडकल्याने हा अपघात घडला. विमानात १७९ जण होते. या अपघातप्रकरणी एअर इंडियाने एका निवेदन दिलं आहे. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या प्रकारच्या अपघाताला 'टेल स्ट्राइक' असे म्हणतात.

दरम्यान विमानाच्या खालच्या भागावर ओरखडे दिसत असलेले या विमानाच्या उड्डाणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विमानाचा मागील भाग धावपट्टीला आदळले, परंतु वैमानिकाने मोठ्या चपळाईने विमान सुरक्षितपणे उतरवले. या अपघातप्रकरणी विमान कंपनी आणि विमानतळाच्या पथकांनी चौकशी सुरू केली आहे.

नागरी विमान वाहतूक नियामक, डीजीसीए (DGCA) यांनाही या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. यानंतर बंगळूरुहून दिल्लीला जाणारे परतीचे विमान एआय२६५२ (AI2652) रद्द करण्यात आले आहे.

विमानाचे उड्डाण रद्द, पर्यायी विमानाची व्यवस्था

या घटनेमुळे बाधित झालेल्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्थेचे आश्वासन एअरलाइनने दिले आहेत. दरम्यान, बंगळूरु विमानतळावरील एअर इंडियाचे ग्राउंड टीम कोणत्याही प्रवाशाला गैरसोय होणार नसल्याची ग्वाही विमान कंपनीने दिली आहे. ग्राउंड स्टाफ विमान रद्द झाल्यामुळे बाधित झालेल्या प्रवाशांना मदत करत असून, त्यांना पुनर्बुकिंग आणि इतर आवश्यक सहाय्य सेवा पुरवत आहेत.

टेल स्ट्राइक म्हणजे काय?

तज्ञांच्या मते, टेकऑफ किंवा लँडिंगच्या वेळी विमानाची शेपटी धावपट्टीला स्पर्श करते, याला टेल स्ट्राइक म्हणतात. ही घटना सामान्यतः जास्त लँडिंग अँगल, जोरदार वारे, पिचमधील अचानक बदल किंवा धावपट्टीची स्थिती यांसारख्या घटकांमुळे घडत असते. अशा प्रकरणांमध्ये, विमानाच्या संरचनेला नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे विमान तात्काळ सेवेतून काढून त्याची तपासणी केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात, वादळी वाऱ्यासह बरसल्या पावसाच्या सरी

Health Tips: जेवल्यानंतर लगेच पाणी पिता का? उद्भवू शकतात 'हे' गंभीर आजार; जाणून घ्या पाणी पिण्याची योग्य वेळ

Weather Update: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, उष्णतेचे आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडीत निघणार; ६ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Acidity : ॲसिडीटीमुळे हैराण झालात? रोज सकाळी प्या 'या' ३ पदार्थांपासून बनवलेले हेल्दी ड्रिंक, पोट होईल साफ

पुणे-कोकण प्रवास आणखी सोपा होणार! पण निधीअभावी रस्ता अजूनही अपूर्ण; प्रशासनाचे दुर्लक्ष?

SCROLL FOR NEXT