Air india representative image
देश विदेश

Sharjah-Bound Air India Flight : १४१ प्रवाशांना घेऊन उडालेलं एअर इंडियाचं विमान हवेत असतानाच बिघडलं; २ तास आकाशातच सुरू होता थरार, वाचा

Sharjah-Bound Air India Flight update : प्रवाशांना घेऊन उडालेलं एअर इंडियाचं विमान हवेतच बिघडल्याची घटना घडली. २ तास आकाशात या विमानाचा थरार सुरु होता.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या विमानात बिघाड झाल्याची माहिती हाती आली आहे. एअर इंडियाच्या लँडिग गिअरमध्ये बिघाड झाल्याची झाला. त्यामुळे एअर इंडियाचं विमान लँडिग कसं होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. १४१ प्रवासी विमान असलेल्या विमानाने दोन तासांनंतर इमर्जन्सी लँडिग केली आहे. विमान प्रशासनाच्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाशांचा जीव वाचला आहे.

एअर इंडियाच्या विमानाच्या लँडिग गिअरमध्ये अचानक बिघाड झाल्याने १४१ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. तमिळनाडूच्या त्रिचीहून शारजाह येथे जाणाऱ्या विमानात बिघाड झाला होता. त्यानंतर विमानतळावरच विमानाने दोन तास घिरट्या मारल्या. मीडिया रिपोर्टनुसार, विमानाची हायड्रोलिक सिस्टम बिघडली. विमानातील पायलटने विनंती केल्यानंतर विमानतळावर आणीबाणी घोषित केली.

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या त्रिचीहून शारजाहला जाणाऱ्या विमानात १४१ प्रवासी आणि पायलट टीममध्ये सदस्य होते. आज सायंकाळी ५.४० वाजता या विमानाने त्रिची विमानतळावरून उड्डाण घेतली होती. त्यानंतर काही वेळातच विमानाच्या लँडिग गिअरशी संबंधित हायड्रोलिक सिस्टम बिघडली. त्यानंतर या विमानाने विमातळावर तब्बल दोन तास घिरट्या मारल्या.

हायड्रोलिक सिस्टम बिघडल्याने विमानाची इमर्जन्सी लँडिग करण्याची तयारी सुरु होती. यामुळे विमानतळ प्रशासनाने २० हून अधिक रुग्णवाहिका, अग्निशमन दलाला तैनात केलं होतं.

या घटनेविषयी अधिकारी सांगत होते की, विमानतळाचे डायरेक्टरने आश्वासन दिलं की, चिंता करण्याची काही गरज नाही. विमानाचं सुरक्षितरित्या लँडिग होणार आहे. या घटनेसाठी रुग्णवाहिका आणि बचाव दलाला तैनात केलंय. दरम्यान, विमानाने विमानतळावर तब्बल दोन तास घिरट्या मारल्यानंतर यशस्वीरित्या तिरुचिरापल्लीत लँडिग केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

SCROLL FOR NEXT