Air India aircraft returns safely to Delhi after circling mid-air for hours due to a technical issue. saam tv
देश विदेश

Air India: हवेतच ७ तास घिरट्या अन्..; दिल्लीहून व्हँकुव्हर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं काय झालं?

Air India Delhi–Vancouver Flight: एअर इंडियाचे दिल्ली ते व्हँकुव्हर विमान AI-185 तांत्रिक बिघाडामुळे जवळपास ७ तास हवेत घिरट्या घालत होते. त्यानंतर सुरक्षितपणे दिल्लीला परत उतरवण्यात आले.

Bharat Jadhav

गेल्या काही दिवसांत विमान अपघाताच्या घटना झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे हवाई प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अहमदाबाद येतील एअर इंडियाच्या विमानाची घटना आठवली तर आपल्या अंगावर काटे येतात. त्याचदरम्यान दिल्लीहून व्हँकुव्हर जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान मोठी बातमी हाती आली.

व्हँकुव्हरला जाणारं विमान मोठ्या दुर्घटनेतून बचावलंय. एका मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीहून व्हँकुव्हरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एआय-१८५ या विमान सुमारे सात तास हवेत घिरट्या मारत राहिले होते. सात तास हवेत राहिल्यानंतर विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर परतले.

हाती आलेल्या माहितीनुसार,विमानाला कॅनडामध्ये उतरण्यास नियामक मंजुरी नाकारण्यात आली. हे एअरलाइनच्या एका चुकीमुळे घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे आता एअरलाइनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर आणि कार्यप्रणालीच्या मानकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान सकाळी ११:३४ वाजता शेकडो प्रवाशांना घेऊन दिल्लीहून निघाले. सुरुवातीला आखाती प्रदेशातील संघर्ष क्षेत्र टाळण्यासाठी विमानाने पूर्वेकडील हवाई क्षेत्र निवडले. परंतु सुमारे चार तासांनंतर जेव्हा विमानाने चीनमधील कुनमिंगजवळील हवाई क्षेत्रात प्रवेश केला, त्यानंतर एअर इंडियाच्या लक्षात आले की, तैनात केलेली बोईंग 777-200LR विमाने कॅनडासाठी अधिकृत नव्हती. एअर इंडियाला कॅनडामध्ये फक्त आपल्या बोईंग 777-300ER विमानांसाठी परवानगी आहे.

चूक कुठे झाली?

तुमच्या माहितीसाठी अनेक देश विमान चालन परवानग्या एअरलाइनच्या आधारावर देतात, तर काही देश त्या विशिष्ट प्रकारच्या विमानांपुरत्या किंवा टेल नंबरपुरत्या मर्यादित ठेवतात. एअरलाइन्सला ही चूक लक्षात येताच त्यांनी हवेत असलेल्या विमानाला दिल्लीला परत बोलावण्यात आले. विमान सायंकाळी सुमारे ७:१९ वाजता सुरक्षितपणे उतवण्यात आले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी कोणत्याही घटनेविना विमानातून उतरले.

एअर इंडियाने काय सांगितले?

एअर इंडियाने एक निवेदन जारी करून या घटनेला 'कार्यवाहीतील अडचण' म्हटले आहे आणि ही कारवाई प्रमाणित कार्यपद्धतीनुसार करण्यात आल्याचे सांगितले आहे. एअरलाइनने म्हटले, "विमान सुरक्षितपणे उतरले असून, सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणकडून अमेरिकेची लक्तरं वेशीला इराणसमोर अमेरिकेचं F-35 जेट फेल?

आताची सर्वात मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

बडे अधिकारीही खरातच्या जाळ्यात? खरातच्या 'दरबारा'तला डेप्युटी कलेक्टर कोण?

'एकनाथ शिंदेंचे फोन कॉल तपासा' विकृत भोंदूबाबाला कोणाचं अभय?

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, रेल्वे सेवा 15 मिनिट उशिराने

SCROLL FOR NEXT