Airplane Saam
देश विदेश

Air India Pilot: अपघाताच्या काही सेकंदांपूर्वी विमानात काय घडलं? पायलटने सिग्नल दिला होता, पण...

Air India Flight Crash: गुरुवारी दुपारी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकसाठी निघालेलं Air India चे AI-171 Boeing 787 विमान टेकऑफनंतर काही सेकंदातच भीषण अपघातग्रस्त झालं.

Bhagyashree Kamble

गुरूवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये एका मोठा विमान अपघात झाला. अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेताच काही सेंकदात कोसळले. अपघाताच्यावेळी विमानात सुमारे २४२ प्रवासी असल्याची माहिती आहे. तसेच १० क्रू मेंबर्स आणि २ पायलटही होते. दरम्यान, अपघातापूर्वी विमानाच्या पायलटनं जवळच्या एटीसीला एक सिग्नल पाठवला होता. त्यांनी एटीसीला संकेत दिले होते. मात्र, काही क्षणात खाली विमान कोसळले.

विमान अपघातानंतर डीजीसीने याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. गुरूवार अहमदाबादहून गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बी ७८७ विमान (एआय - १७१) टेकऑफनंतर लगेचच कोसळले. या विमानात एकूण २४२ प्रवासी होते. ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू मेंबर्स होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरलाल चालवत होते. तर, त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर देखील होते.

एअर इंडिया विमानाने दुपारी १: ३९ मिनिटांनी उड्डाण केले होते. उड्डाण घेताच, पायलटनं एटीसीला MAYDAY कॉल केला होता. परंतु, त्यानंतर विमानाने एटीसीला कोणताही सिग्नल दिलेला नाही. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान बाहेर पडले आणि काही सेंकदातच कोसळले.

MAYDAY कॉल म्हणजे काय?

कोणत्याही विमानाच्या आपत्कालीन किंवा गंभीर स्थितीवेळी मेडे कॉल दिला जातो. विमान गंभीर संकटात असताना, प्रवाशांच्या किंवा क्रूच्या जीवाला धोका असताना पायलट हा मेडे कॉल देतो. जसे की, विमानाची इंजिन निकामी होणे, विमानाला आग लागणे, हवेत टक्कर किंवा अपहरणासारखी स्थिती. अशावेळी पायलट संकेत देत असतो. या कॉलद्वारे कोणताही पायलट एअर ट्र्रॅफिक कंट्रोल आणि जवळच्या विमानांना सूचित करतो की, विमानाला तात्काळ मदतीची आवश्यकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT