Shocking Incident X
देश विदेश

Shocking : धक्कादायक! एम्समधील नर्सच्या दोन चिमुकल्यांना घरात जिवंत जाळलं; आईनं हंबरडा फोडला

Shocking Incident : एम्समध्ये काम करणाऱ्या एका नर्सच्या घरात घुसून काही गुंडांनी तिच्या मुलांना जिवंत जाळले. ही घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला आहे.

Yash Shirke

  • एम्समध्ये काम करणाऱ्या नर्सच्या घरावर गुंडांचा हल्ला

  • नर्सच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना गुंडांनी जिवंत जाळलं

  • भीषण घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली

Shocking News : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) पटनामध्ये काम करणाऱ्या एका नर्सच्या दोन निष्पाप मुलांना जिवंत जाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बिहारची राजधानी असलेल्या पटना येथील जानीपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे आसपास खळबळ उडाली आहे.

आगीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलांची ओळख अंजली आणि अंशी अशी झाली आहे. ही दोन्ही मुले जानीपूर येथे राहणाऱ्या शोभा देवी गुप्ता आणि ललन कुमार गुप्ता यांची अपत्ये होती. मुले शाळेतून घरी परतत असताना ही घृणास्पद घटना घडल्याचे म्हटले जात आहे. शोभा देवी या एम्स पटनामध्ये नर्स म्हणून कार्यरत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुले शाळेतून घरी आल्यानंतर काही गुंड त्यांच्या घरात घुसले. गुंडांनी दोन्ही मुलांना पेटवून दिले. आगीमुळे मुलांचा जळून घरातच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

या घटनेचे सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बेडवर पडलेला मुलाचा जळालेला मृतदेह दिसतो, त्याच्या तोंडावर कपडा बांधलेला असल्याचे पाहायला मिळते. एम्समध्ये नर्स असलेल्या शोभा देवी गुप्ता या घराच्या दरवाजावर मुलाच्या मृतदेहाजवळ रडत बसल्या आहेत, त्यांचे शेजारी सांत्वन करत आहेत, असे व्हिडीओत दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT