Ahmedabad plane crash Saam
देश विदेश

Air India Plane Crash: अहमदाबादमधील विमान अपघाताचा दुसरा VIDEO; धुरानं काळवंडलेला परिसर आणि सांगाडा

Ahmedabad plain crash: गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानीनगर परिसरात Air India Flight AI171 या Boeing 787-8 Dreamliner या विमानाचा भीषण अपघात घडला. या अपघाताचा दुसरा भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

गुजरातच्या अहमदाबाद येथील मेघानीनगर परिसरात Air India Flight AI171 या Boeing 787-8 Dreamliner या विमानाचा भीषण अपघात घडला. मेघानीनगर परिसरातून टेकऑफ घेताच खाली कोसळलं. डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या भींतीवर आदळल्यानं विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दरम्यान, याचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या दुसऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये विमानाचा सांगाडा दिसत आहे.

विमान कोसळताच आगीचे २ किमीपर्यंत धुराचे लोट पाहायला मिळाले. विमानाचा चक्काचूर झाला असून, विमानाच्या सांगाड्याचा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अग्निशमन दलातील जवान आणि बचाव पथकातील जवान प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अग्निशमन दलातील गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, जवानांकडून प्रवाशांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

नेमका अपघात घडला कसा?

अहमदाबाद विमानतळावरून दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी विमानाने टेकऑफ केलं. विमान अहमदाबाद येथून लंडनसाठी रवाना होणार होतं, पण टेकऑफ करताच काही सेकंदात डॉक्टरांच्या वसतीगृहाच्या भींतीवर धडकली असल्याची माहिती आहे. त्यानंतर विमान अतिवेगाने खाली कोसळलं. या विमानात २४२ प्रवासी, २ पायलट आणि १० क्रू मेंबर्स होते.

अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या ७ गाड्या घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. याघटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT