Crime Saam Tv
देश विदेश

Crime: दीराकडून वहिनीसोबत अश्लील कृत्य, नवऱ्यानं आक्षेपार्ह व्हिडिओ काढला; पीडितेकडे नको ती मागणी करताच...

Wife Alleges Husband Recorded Obscene Video: पतीने आधी आपल्या पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून तब्बल ५० लाख रुपयांची मागणी केली.

Bhagyashree Kamble

माणुसकीला काळिमा फासणारी घटना आग्रा शहरातील ताजगंज परिसरातून समोर येत आहे. आधी दिराने वहिनीसोबत अश्लील कृत्य केलं. नंतर पतीने पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढून धमकी देत ५९ लाख रूपयांची मागणी केली. विरोध केल्यावर पीडितेवर शारीरिक अत्याचार करून तिहेरी तलाक देत तिला घराबाहेर हाकलून लावलं. याच प्रकाराला कंटाळून पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात तक्रार दाखल केली.

ताजगंज पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, १६ डिसेंबर २०२१ रोजी महिलेचा विवाह झाला होता. लग्नाच्या काही दिवसानंतर पीडितेच्या दिराने वहिनीसोबत अश्लील वर्तन करण्यास सुरूवात केली. जेव्हा तिने या गोष्टीला विरोध केला. तेव्हा तिच्या पतीने तिचे अश्लील व्हिडिओ शूट करून व्हायरल करण्याची धमकी दिली.

तसेच ब्लॅकमेल करून पीडितेकडे ५० लाख रूपयांची मागणी केली. याशिवाय सासरच्यांकडूनही सतत हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची माहिती पीडितेच्या वडिलांनी दिली. पीडितेने हा सर्व प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितल्यावर तिचा गळा दाबून खून करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.

त्यानंतर पीडितेला बेदम मारहाण करून तिहेरी तलाक देऊन तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर हाकलून लावले. ताजगंज पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, पुरावे गोळा करून कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT