Crime News Saam tv
देश विदेश

Crime News: क्रूरतेचा कळस! पतीला बांधून ठेवलं अन् पत्नीवर ४ जणांकडून सामूहिक अत्याचार; व्हिडिओही काढला

Shocking Crime News in Agra: आधी ४ जण घरात शिरले नंतर चौघांनी मिळून महिलेवर अत्याचार केला. हा अत्याचार त्यांनी महिलेच्या पतीसमोरच केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

आधी घरात ४ जण शिरले नंतर चौघांनी नवऱ्यासमोर बायकोवर लैंगिक अत्याचार केला, आणि व्हिडिओ काढून धमकीही दिली. मात्र पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत चौघांविरोधात तक्रार दाखल केली. ही धक्कादायक घटना आग्रा येथील ट्रान्स यमुना पोलीस स्टेशन परिसरातील एका घरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे

आग्रा येथील ट्रान्स यमुना परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका महिलेवर ४ नराधमांनी लैंगिक अत्याचार केला आहे. हा लैंगिक अत्याचार त्यांनी नवऱ्यासमोर केला आहे. महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, १ फेब्रुवारीच्या रात्री सलीम शाह, अरमान, अमीन आणि शानू हे ४ आरोपी घरात शिरले.

सलीम शाहने महिलेला पकडले. इतरांनी नवऱ्याला बांधले. त्यावेळेस नवऱ्याने विरोध केल्यानंतर त्याला मारहाणही करण्यात आली. त्यानंतर महिलेवर नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. पती वारंवार नराधमांसमोर विनवणी करत राहिला, परंतु आरोपी महिलेवर अत्याचार करत राहिले. नंतर आरोपींनी मिळून महिलेचा व्हिडिओ देखील शूट केला. पती आणि पत्नीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आणि गप्प राहण्यास सांगितले.

२ फेब्रुवारी रोजी पीडितेला पुन्हा मारहाण

पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यापूर्वी आरोपी २ फेब्रुवारीला पुन्हा घरात शिरले. पीडित महिला आणि तिच्या पतीवर घरात घुसून हल्ला चढवला. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाणे गाठले आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. आरोपी त्याच घरात भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसर हादरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT