delhi crime SaamTv
देश विदेश

Delhi Crime: दिल्ली पुन्हा हादरली! ब्रेकअपमुळं दुखावलेल्या बॉयफ्रेंडचे तरुणीसोबत हादरवणारं कृत्य; VIDEO आला समोर

या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीच्या बाबू जगजीवन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Gangappa Pujari

Delhi: दिल्लीमधील नववर्षाच्या रात्री झालेल्या भीषण अपघाताची बातमी ताजी असतानाच राजधानी दिल्लीमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याने तरुणाने तरुणीवर सपासप वार केल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना सोमवारी दिल्लीच्या आदर्शनगर भागात घडली असून युवतीवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. (Delhi Crime)

याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी सिमरजित ही दिल्ली विद्यापीठात बी.ए.चे शिक्षण घेत होती; 5 वर्षांपूर्वी तिची सुखविंदरशी मैत्री झाली. दोघांमध्ये मैत्रीचे घट्ट नाते तयार झाले होते. मात्र मुलीच्या घरच्यांना त्यांचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळेच मुलीने स्वतः हून सुखविंदरपासून लांब राहायला सुरूवात केली. मात्र या गोष्टीचा सुखविंदरला राग आला होता. याच रागात त्याने मुलीवर हल्ला केला.

सोमवारी त्याने पीडित मुलीला ब्रेकअपचे कारण जाणून घ्यायचे असल्याचे सांगत भेटायला बोलावले. यावेळी त्याने मुलीवर चाकूने हल्ला चढवला. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर दिल्लीच्या बाबू जगजीवन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या संपूर्ण घटनेचे सीटीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. ज्यामध्ये सुखविंदर मुलीवर हल्ला करताना करताना दिसत आहे. मुलीच्या मानेवर, पोटावर आणि हातावर अनेक जखमा झाल्याचेही पाहायला मिळत आहे. हल्ला केल्यानंतर मुलगा घटनास्थळावरून पळून गेला. परिसरातील शेजाऱ्यांनी गोंधळ ऐकून सिमरजितच्या मदतीसाठी धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Richest Women: देशातील सर्वात श्रीमंत महिला कोण? संपत्ती वाचून धक्का बसेल

Pod Taxi: कुर्ला- वांद्रेमधील गर्दीची झंझट संपणार, पॉड टॅक्सीने थेट रेल्वे स्टेशनवर जाता येणार, MMRDA चा मास्टारप्लान काय?

अश्लील फोटो अन् मेसेज; पश्चिम महाराष्ट्राच्या आमदाराला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न, तरूणाला अटक

Bigg Boss 19: 'दारू पिऊन फुगले, एक-दोन नव्हे तर आठ रिलेशनशिप...'; कुनिका सदानंदने स्वत:बद्दल केले धक्कादायक खुलासे

GST कपातीनंतर EMI चा भार हलका होणार; कर्जाच्या नियमांत होणार मोठे बदल

SCROLL FOR NEXT