Afghanistan : काबुल विमानतळावर महागाईमुळे लोकांचे खाण्यापिण्याचे हाल Saam Tv
देश विदेश

Afghanistan : काबुल विमानतळावर महागाईमुळे लोकांचे खाण्यापिण्याचे हाल

काबूल विमानतळावर उपासमारीची वेळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : तालिबान्यांनी Taliban अफगाणिस्तान Afghanistan ताब्यात घेतल्यानंतर या देशामध्ये सर्व काही बदले आहे. जास्तीत- जास्त लोक या देशातून कसे बाहेर पडता येणार, हाच विचार करत आहेत. अफगाणिस्तान मधून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग शिल्लक राहिला आहे, ते म्हणजे 'काबूल विमानतळ'. Kabul Airport याठिकाणी सुरक्षा अमेरिकन सैनिकांकडे आहे. सध्या या विमानतळावर सुमारे अडीच लाख लोकांची गर्दी आहे.

यातील प्रत्येकजण आपला जीव वाचवण्याकरिता अफगाणिस्तान सोडण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीदेखील भुकेले आणि तहानलेले लोक विमानतळावर आपला जीव सोडताना दिसत आहेत. दरम्यान, विमानतळावर अन्न आणि पाण्याचे दर देखील आता गगनाला भिडले असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. याठिकाणी पाण्याची बाटली ४० डॉलर म्हणजे, ३ हजार रुपयांना उपलब्ध आहे.

हे देखील पहा-

तर, भाताच्या प्लेटकरिता १०० डॉलर म्हणजेच, ७ हजार ५०० रुपये खर्च करावे लागत आहेत. विमानतळावर पाणी किंवा अन्न खरेदी करायचे म्हटले, तर याठिकाणी अफगाण चलन घेतले जात नाही. यामुळे फक्त डॉलर स्वीकारले जात आहेत. अफगाणिस्तान मधील लोकांचे म्हणणे आहे की, त्यांना काबूल मधील घरामधून विमानतळावर पोहोचण्याकरिता ५ ते ६ दिवस लागले आहेत. कारण, तालिबान्यांचा शहरापासून विमानतळापर्यंत पहारा लागला आहे.

तालिबान्यांच्या गोळीबाराने दहशत माजली आहे. हजारोंचा जमाव ओलांडून विमानतळावर प्रवेश मिळवणे हे खूप कठीण काम आहे. तुम्ही विमानतळाच्या आतमध्ये गेलात तरी विमान येण्यास ५ ते ६ दिवस लागत आहेत. यामुळे फक्त बिस्किटवर अवलंबून राहावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. खाण्या- पिण्याच्या किंमती जास्त असल्यामुळे त्यांच्या समस्याही वाढल्या आहेत.

अफगाणिस्तानची स्थिती अशी आहे, की अनेक मुले त्यांच्या पालकांशिवाय अफगाणिस्तान सोडत आहेत. अन्न आणि पाण्याच्या किमतीत वाढ झाल्याने लोकांना उपाशी पोटी उन्हात उभे राहावे लागत आहे. शरीरात अशक्तपणा निर्माण होता आहे. ते लोक बेशुद्ध पडताना देखील दिसत आहेत. अशा स्थितीमध्ये, लोकांना मदत करण्याऐवजी तालिबान त्यांना घाबरवत आहे, मारत आहे.

काबूल विमानतळाबाहेर झालेल्या गोंधळामध्ये आत्तापर्यंत २० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काबूलमधून आत्तापर्यंत ८२,३०० लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे. काबुलमध्ये जवळ- जवळ ६ हजार अमेरिकन सापडले आहेत. त्यापैकी ४ हजार ५०० लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, यावर तालिबानने आपली प्रतिक्रिया देताना सांगितले आहे, की जर अमेरिकेनं ३१ ऑगस्टपर्यंत आपली मोहीम संपवली नाही, तर त्याचे परिणाम खूप भयंकर असणार आहेत, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT