Afghanistan : काबुल विमानतळाबाहेर सलग ३ स्फोट, १३ अमेरिकी सैन्यासह ७२ लोकांचा मृत्यू  Saam Tv
देश विदेश

Afghanistan : काबुल विमानतळाबाहेर सलग ३ स्फोट, १३ अमेरिकी सैन्यासह ७२ लोकांचा मृत्यू

अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सलग ३ स्फोट झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : अफगाणिस्तानची Afghanistan राजधानी काबुलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर Kabul Airport सलग ३ स्फोट Explosion झाले आहेत. १३ अमेरिकन सैनिकांसह ७२ जण ठार झाल्याचे वृत्त समजले आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागनने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी १ स्फोट हमीद करझई Hamid Karzai आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अबे गेटवर Abe Gate करण्यात आला आहे.

यानंतर काही वेळातच विमानतळाजवळ बॅरॉन हॉटेलजवळ ३ स्फोट करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, याठिकाणी ब्रिटिश सैनिक थांबले होते. तालिबानने आतापर्यंत ७२ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, अमेरिकेने या हल्ल्यासाठी ISIS या दहशतवादी संघटनेला जबाबदार पकडले जात आहे.

हे देखील पहा-

काबूल विमानतळ आणि आसपासच्या परिसरामध्ये स्फोटामुळे दहशतीचे चांगलेच वातावरण तयार झाले आहे. रशियन मीडिया स्पुतनिकने ७२ लोकांचा मृत्यू तर १४० पेक्षा जास्त गंभीर रित्या जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या स्फोटात १३ अमेरिकन सैनिक आणि एक नागरिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.

भास्करच्या सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हा स्फोट विमानतळाजवळ बॅरन हॉटेलजवळ करण्यात आला आहे, तर ३ स्फोट विमानतळाच्या अब्बे गेटजवळ करण्यात आला आहे. या ठिकाणी अमेरिकन सैनिक तैनात करण्यात आले आहे. यूकेच्या संरक्षण मंत्रालयाने दोन्ही स्फोटांची पुष्टी केली आहे. काबूल विमानतळावर सर्व उड्डाणे सुरक्षेकरिता रद्द करण्यात आली आहेत.

सर्व विमाने नाटो सैन्याने सुरक्षा कवचात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांना या हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे. विमानतळावर नेहमीच गोळीबार होत असल्याच्याही बातम्या मिळत आहेत. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमध्ये अनेक अफगाणी मारले गेले आहेत. अनेक जण जखमी देखील झाले आहेत.

पेंटागननेही फिदायीन हल्ल्याची पुष्टी केली आहे. याअगोदर तालिबानने अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत देश सोडण्याचा इशारा दिला आहे. अमेरिकेने ठरवलेल्या काळात देशातून सैन्य मागे घेण्याबाबत बोलले होते. दरम्यान, आज व्हाईट हाऊसने ३१ नंतर देखील गरज पडल्यास बचाव कार्य राबवण्याची घोषणा करण्यात आली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Viral Video: पेट्रोल पंपावर महिलांचा राडा, आधी चप्पल फेकून मारली, नंतर जमिनीवर आपटलं!

Chakli Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत चकली, जाणून घ्या सोपी आणि जलद रेसिपी

Chocolate Recipe: फक्त 'या' ४ पदार्थांपासून बनवा चॉकलेट, तोंडात टाकताच विरघळेल

Maharashtra Live News Update: मुंबई स्फोटकांनी उडवून देण्याच्या कालच्या थ्रेडनंतर मुंबई पोलिस सतर्क

SCROLL FOR NEXT