काबूल पुन्हा हादरलं! विमानतळाजवळ झाला राॅकेट हल्ला Saam Tv
देश विदेश

काबूल पुन्हा हादरलं! विमानतळाजवळ झाला राॅकेट हल्ला

अफगाणिस्तानची (Afganistan Bomb blast) राजधानी काबूल (Kabul) आज पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे.

वृत्तसंस्था

अफगाणिस्तानची (Afganistan Bomb blast) राजधानी काबूल (Kabul) आज पुन्हा एकदा स्फोटाने हादरली आहे. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, हा स्फोट काबूलच्या विमानतळाजवळील निवासी भागात झाला आहे. वृत्तसंस्था एपीने एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की हा रॉकेट हल्ला होता. ज्यात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, न्यूज एजन्सी रॉयटर्सने दोन अमेरिकन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की अमेरिकेने काबुलमधील संशयित इसिस-के दहशतवाद्यांना लक्ष्य करून हा हल्ला केला आहे. आतापर्यंत यासंदर्भात कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

आकाशात उडणाऱ्या काळ्या धुराचे फुटेज स्थानिक टेलिव्हिजन वाहिन्यांमधून समोर आले आहे. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. स्थानिकांचे म्हणणे आहे की हा स्फोट विमानतळ परिसराच्या उत्तर बाजूला झाला आहे. टोलो न्यूजच्या वतीने असे म्हटले गेले आहे की हा हल्ला काबूल विमानतळाजवळ खाजा बागरा परिसरातील एका निवासी इमारतीला लक्ष्य करण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने माध्यमांनी रॉकेट हल्ल्याची पुष्टी केली आहे. या हल्ल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये निवासी भागातील घरातून काळा धूर आणि ज्वाला उठताना दिसत आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी स्वतः या हल्ल्याबद्दल चेतावणी दिली होती. त्यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काबुल विमानतळावर पुढील 24 ते 36 तासांमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची दाट शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lunar Eclipse: वर्षातलं दुसरं चंद्रग्रहण कधी? यावेळी कोणत्या गोष्टी कराव्या, जाणून घ्या.

Maharashtra Live News Update: मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे वाहतूक कोंडी

उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद वाढली; काँग्रेस- ठाकरे गटातील कार्यकर्त्यांची एकनाथ शिंदेंना साथ

Election Commission: 'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT