Accident x
देश विदेश

Accident : बसचालकाला हृदयविकाराचा झटका, चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला अन् मोठा अनर्थ घडला; Video

Chinnaswamy Stadiumसमोर भीषण अपघात घडला. एका बसने नऊ वाहनांना लागोपाठ धडक मारली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातात एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला.

Yash Shirke

  • बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ अपघात

  • बसने सलग ९ वाहनांना धडक मारली

  • चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटल्याने अनर्थ घडला

Accident News : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ मोठा अपघात घडला. बीएमटीसीच्या (बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) एका बसने नऊ वाहनांना धडक मारली. चालकाचा बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएमटीसी बस चिन्नास्वामी स्टेडियमजवळ असताना चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले. बस चालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्याने चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबल्याने अपघात झाला. त्यामुळे बस एकामागून एक पुढे असलेल्या वाहनांना धडक देत गेली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.

बस चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला. त्याने चुकून अ‍ॅक्सिलरेटर दाबला आणि बस सलग ९ वाहनांना धडक देत पुढे जात राहिली. यादरम्यान कंडक्टर पुढे धावला. त्याने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला बस थांबवता आली नाही. चालकाला झटका आल्याचे आणि बसचा वेग वाढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

भरधाव वेगाने येणाऱ्या बसने तब्बल नऊ वाहनांना जोरदार धडक मारली. यात एक ऑटोरिक्षा, कार, दुचाकीचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. धडकेमध्ये एका ऑटोरिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान क्यूबन पार्क वाहतूक पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले आहे आणि चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भूकंपाच्या धक्क्याने नांदेड हादरलं, मध्यरात्री एक वाजून 37 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का

Pune Rain: पुण्यात पावसाचा कहर! ओढ्याला आलेल्या पूरात शेतकरी वाहून गेला, शेतामध्ये गेले असता भयंकर घडलं

Maval landslide: दरडीनंतर गाव रिकामं करण्याचा निर्णय महागात पडला, दुसरीकडे राहायला गेले अन् घरातलं सर्वकाही गेलं

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

SCROLL FOR NEXT