Accident Viral Video Saam TV
देश विदेश

Accident Viral Video: आधी उडाली, मग उलटली; मात्र इतक्या भीषण अपघातातून चालक वाचला, व्हिडीओ पाहून थरकाप उडेल

आधी उडाली, मग उलटली; मात्र इतक्या भीषण अपघातातून चालक वाचला, पाहा व्हिडीओ

Satish Kengar

Accident Viral Video: जगात दररोज शेकडो रस्ते अपघात होत असतात. त्यापैकी काही इतके धक्कादायक असतात की ते पाहून कोणत्याही व्यक्तीला थरकाप उडू शकतो.

सध्या सोशल मीडियावर अशा घटनांचे सीसीटीव्ही फुटेज सातत्याने व्हायरल होत आहेत. जे नेटकऱ्यांना शिकवत आहेत की, रस्त्यावर चालताना वाहतूक नियमांचे पालन करणे किती महत्वाचे आहे.

अशाच एका अपघात घटनेचा व्हिडीओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत भीषण अपघात झाल्याचं दिसत आहे. चालकाच्या चुकीमुळे या कारचा मोठा अपघात झाल्याचं व्हिडीओत (Viral Video) दिसत आहे. हा अपघात इतका भीषण होता की, कार आधी उडते आणि मग दोन ते तीन वेळा उलटते. चालकाचं कारवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. (Latest Marathi News)

अनेकदा वाहतूक पोलीस गाडी चालवताना सीट बेल्ट लावायला सांगतात. व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) कार रस्त्यावरून उतरून साईडला जाते, तेव्हा ती कोणत्याही नियंत्रणाशिवाय हवेत फिरू लागते. यादरम्यान कारचा दरवाजा उघडतो आणि सीट बेल्ट न लावल्यामुळे ड्रायव्हर अनेक फूट हवेत उडी मारून रस्त्यावर पडताना दिसतो.

दरम्यान, अनेक रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये असे दिसून आले आहे की सीट बेल्ट न घातल्याने लहान-मोठ्या अपघातांमध्येही लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19 : अमाल मलिकने तान्या मित्तलला रडवलं; प्रणित मोरेनंतर 'हा' सदस्य बनवा नवा कॅप्टन, पाहा VIDEO

Recharge Update: लाखो यूजर्सना मोठा धक्का! 'या' कंपनीने एकाच वेळी अनेक प्लॅनची वैधता केली कमी

Winter Health Tips: हिवाळ्यात रात्री हे पदार्थ टाळा; अन्यथा सर्दी-खोकल्याने व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्गात युती नकोच भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा

Gulmarg Snowfall : निसर्गाचा अद्भुत नजारा, गुलमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी पर्यटनासाठी नंदनवन खुलले! | VIDEO

SCROLL FOR NEXT