Accident  Saam TV
देश विदेश

VIDEO: ट्रकनं आधी आजोबांना चिरडलं, नातवाला 3 किमी फरफटत नेलं, अपघाताचा थरारक व्हिडीओ

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Accident News : उत्तर प्रदेशच्या महोबा शहरात एका विचित्र अपघातात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला आहे. महोबा शहरातील कोतवाली भागात एचपी पेट्रोल पंपासमोर हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे.

ट्रकने स्कूटील धडक देत आजोबांना चिरडलं. त्यानंतर ट्रकचालकाने स्कूटीमध्ये अडकलेल्या निष्पाप मुलाला तब्बल 3 किलोमीटरपर्यंत खेचत नेले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उदित नारायण (वय 67 वर्ष) आणि सात्विक (वय 6 वर्ष) असं आजोबा नातवाचं नाव आहे. सात्विक आजोबांसोबत घराबाहेर पार्क केलेल्या स्कूटीवर बसला होता. दरम्यान भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर ट्रक चालकाने दोघांनाही जोरदार धडक दिली. यादरम्यान डंपर चालकाने स्कूटीवर बसलेला नातू सात्विक याला बेदरकारपणे महामार्गावर सुमारे ३ किलोमीटरपर्यंत फरपटत नेलं. (Latest News Update)

अपघातात उदितचा यांचा जागीच मृत्यू झाला, तर सात्विक आणि दुचाकी जवळपास दोन किलोमीटरपर्यंत फरपटत नेली. कानपूर-सागर हायवे NH86वर ही दुर्घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका व्हिडिओमध्ये अनेक दुचाकीस्वार ट्रकजवळ चालकाला सावध करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी दगड फेकल्यानंतर ट्रक अखेर थांबला. त्यानंतर स्थानिक लोकांनी ट्रक चालकाला बेदम मारहाण केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ यांचा एकत्र विमानाने प्रवास

Taloda Heavy Rain : मुसळधार पावसामुळे आतोनात नुकसान; मिरचीसाठी अडीच लाख खर्च, उत्पन्न २५ हजाराचे

Pitru Paksha 2025: पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षात करा हे दान

Shocking : भयंकर! छातीवर बसून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला; बॉयफ्रेंडचं कृत्य, बायको निर्दयतेने बघत राहिली

Heart Attack: अपुऱ्या झोपेमुळे ४५% लोकांना हार्ट अटॅक; कोणत्या वयोगटाला धोका जास्त? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT