CCTV Video  Saam TV
देश विदेश

CCTV Video : कुत्र्याचा पाठलाग जीवावर बेतला; तिसऱ्या मजल्यावरून तरुण खाली पडला, घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

Man Falls Off Third Floor : कुत्र्याशी मस्ती करताना तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. तरुण थेट तिसऱ्या मजल्यावरू खाली पडला. घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Ruchika Jadhav

मृत्यू कधी आणि कसा ओढावेल काहीच सांगता येत नाही. हैदराबादच्या व्हीव्ही प्राइड या हॉटेलमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली आहे. या घटनेत एक व्यक्ती कुत्र्याचा पाठलाग करताना मृत्यू पावला आहे. कुत्र्याच्या मागे धावताना तो इमारतीवरून खाली कोसळला आहे.

या घटनेचा संपूर्ण थरार समोर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हैदराबादच्या चंदननगर परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुण तिसऱ्या माळ्यावर उभा आहे. इमारतीत एक कुत्रा येतो. तो कुत्र्याला पाहून त्याच्याशी खेळू लागतो. सुरुवातीला हा व्यक्ती कुत्र्याच्या मागे धावत जातो आणि त्याला घाबरवतो. इमारतीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तो कुत्र्याच्या मागे पळत असतो.

तितक्यात समोर इमारतीच्या खिडक्या येतात. समोर सर्व काचा बंद असतात. मात्र यातील एक खिडकी उघडी असते. तरुण धावत पुढे येतो तेव्हा त्याला त्याचा तोल सावरत नाही. त्याचा तोल जातो आणि तो थेट खिडकीतून बाहेर फेकला जातो. तिसऱ्या माळ्यावरून जोरदार खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. उदय कुमार असं त्याचं नाव असून तो अवघ्या २३ वर्षांचा होता.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र फिरताना दिसत आहे. तरुण खाली पडल्यावर मोठा आवाज झाला. त्यावेळी हॉटेलमधील अन्य व्यक्तींनी देखील तेथे धाव घेतली आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र उंचावरून उडी घेतल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तरुण त्याच्या मित्रांसह एका बर्थडे पार्टीसाठी येथे आला होता. पार्टीला आल्यावर केलेली मस्ती थेट तरुणाच्या जीवावर बेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का! निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकांमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

SCROLL FOR NEXT