Accident News Saam tv
देश विदेश

Accident News: धक्कादायक! शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकची धडक, 7 विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू

या घटनेत ऑटो चालकही गंभीर जखमी झाला असून, सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Gangappa Pujari

ChattisGarh Accident: छत्तीसगड राज्यात कांकेर जिल्ह्यातील कोरार गावाजवळ शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटोला ट्रकने धडक दिल्याने सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थी आणि ऑटोचालक जखमी आहेत. जखमी विद्यार्थ्यांना कोरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, महानिरीक्षक बस्तर पी सुंदरराज यांनी या अपघाताची माहिती दिली आहे. (Accident News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील कांकेर येथील कोरेरजवळची ही घटना आहे. शाळा संपल्यानंतर बारा मुले ऑटोने आपल्या घरी जात होती. यादरम्यान कोरेरजवळ भरधाव ट्रकने ऑटोला धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की ऑटोचे पार्ट उडून गेले. ज्यामध्ये 5 मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 मुले जखमी झाली. या घटनेत ऑटो चालकही गंभीर जखमी झाला असून, सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

याबाबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही दुःख व्यक्त केले आहे. "कांकेर जिल्ह्यातील कोरेर चिल्हाटी चौकात ऑटो आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत झालेल्या अपघातात 5 शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. 4 मुले गंभीर जखमी, आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. देव त्यांच्या कुटुंबीयांना धीर देवो. प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना आहेत, असे ट्विट त्यांनी केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT