गाझीपूरात भीषण अपघात! भरधाव ट्रकने 10 जणांना चिरडले, 6 जणांचा मृत्यू Saam Tv
देश विदेश

गाझीपूरात भीषण अपघात! भरधाव ट्रकने 10 जणांना चिरडले, 6 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश मधील गाझीपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश मधील गाझीपूर जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. त्या अपघातमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमकरिता पाठवण्यात आले आहे. या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

नेमके काय घडलं? सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेश मधील गाझीपूर जिल्ह्यामधील मुहम्मदाबाद पोलिस स्टेशन हद्दीतील अहिरोली गावात भीषण अपघात घडला आहे. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ७ वाजता अहिरोली चाटीजवळ एक अनियंत्रित ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या झोपडीत धुसला आहे. यादरम्यान ट्रकने झोपडीत झोपलेल्या १० जणांना चिरडले आहे, यामध्ये ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमी झाले आहेत.

नुकसान भरपाईची मागणी अपघातानंतर मृतांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी ट्रक अनियंत्रित होण्याचे कारण अद्याप सांगितले नाही. सध्या पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मृतदेह राष्ट्रीय महामार्गावर ठेवून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. काही वेळानंतर पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून शांत करण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

SCROLL FOR NEXT