ABHIJIT DIPKE BIG ANNOUNCEMENT: CJP TO ACT AS PRESSURE GROUP, NOT POLITICAL PARTY saam tv
देश विदेश

दिपकेंचा पॉवर प्ले, पक्ष नव्हे दबावगट बनवणार, CJPच्या बैठकीत ठरणार GEN Zचा रोडमॅप

Abhijit Dipke Cjp Pressure Group Not Political Party: जंतर-मंतरवरील यशस्वी आंदोलनानंतर सीजेपी राजकीय पक्ष बनणार का, यावरून जोरदार चर्चा रंगलीये. मात्र दिपकेंनी याबाबत धक्कादायक घोषणा केलीय. नेमकी काय आहे ही घोषणा? संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या दोन दिवसांच्या सीजेपीच्या बैठकीत याबाबत काय रणनीती ठरलीय? पाहूयात यावरचा हा रिपोर्ट...

Snehil Shivaji

अभिजित दिपकेंचं ठरलं. देशभरातून छत्रपती संभाजीनगर मध्ये आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी सध्या 2 दिवसांचा कॉक्रोच कॉन्क्लेव घेत सीजेपीचा रोडमॅप ठरवणार आहेत. नीट पेपरफुटीनंतर मोदी सरकार विरोधात देशभरात जोरदार आंदोलन उभारून शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता दिपकेनीं नवी राजकीय गुगली टाकलीये. आता देशाला नव्या पक्षाची नाही तर सरकारवर दबाव गटाची गरज असल्याचं कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी म्हटलंय.

देशाला अभिजित दिपकेंच्या रुपानं एक नवा राजकीय चेहरा मिळतोय असं वाटत असतानाच, दिपकेंच्या या घोषणेनं चित्र स्पष्ट केलंय. कॉक्रोच जनता पार्टी हा सध्या तरी निवडणूक लढवणारा राजकीय पक्ष असणार नाही. दिपकेंच्या या भूमिकेमुळे प्रस्थापित राजकीय पक्षांचा जीव भांड्यात पडला असला, तरी सत्ताधाऱ्यांची धाकधूक मात्र वाढलीय. कारण, सत्ता कोणाचीही असो, सरकारला नमवायचं असेल, तर दबावगट कसा प्रभावी ठरतो याची इतिहासात अनेक उदाहरणं आहेत.

मराठा क्रांती मोर्चा

भारतीय किसान युनियन

संयुक्त किसान मोर्चा

भारतीय मजदूर संघ

इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA)

या दबावगटांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरून सरकारला आपल्या मागण्या मान्य करायला भाग पाडलंय. पण नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा इतिहास सांगतो की, देशात दबावगट म्हणून जन्माला आलेल्या अनेक चळवळींचा प्रवास पुढे राजकीय पक्षापर्यंत येऊन पोहचलाय. त्याची सर्वात बोलकी उदाहरणं म्हणजे...

शिवसेना

मराठी माणसाच्या हक्कासाठी संघटना म्हणून सुरू झालेल्या चळवळीने, वर्षभरातच राजकीय मैदानात उतरून राजकीय पक्षाचं रूप घेतलं.

संपूर्ण क्रांती ते जनता पार्टी

इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरोधात जयप्रकाश नारायणांनी पेटवलेली संपूर्ण क्रांती पुढे जनता पार्टी बनून सत्तेवर आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना

राजू शेट्टींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी उभारलेला दबावगट पुढे थेट निवडणूक लढवणारा पक्ष बनला

इंडिया अगेन्स्ट करप्शन ते आम आदमी पार्टी

अण्णा हजारेंनी लोकपाल आंदोलन हा एक अतिशय मजबूत दबावगट तयार केला, सरकारनं कायदा बनवल्यानंतर अरविंद केजरीवालांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली

आंदोलनातून उगम आणि सत्तेत सहभाग... हा दबावगटांचा आजवरचा इतिहास राहिलाय! जनाधार वाढला, की लोकांच्या अपेक्षा वाढतात आणि याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शेवटी राजकीय भूमिका घेऊन सत्तेचाच मार्ग निवडावा लागतो, हेच आजवर सिद्ध झालंय. त्यामुळे आज जरी अभिजित दिपकेंची कॉक्रोच जनता पार्टी सत्ताधारी आणि विरोधकांवर अंकुश ठेवणारा दबावगट असण्याचा दावा करत असली... तरी आजचा दबावगट, उद्याचा राजकीय पक्ष बनला आणि उद्या दिपके निवडणुकीच्या रिंगणात उतरले... तर नवल वाटायला नको!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Lifestyle : विकतचे पनीर की घरगुती टोफू? काय खाणं आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या

Thursday Horoscope : कामात संयम ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींवर राहणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

विरारमधील धक्कादायक घटना! दुसऱ्या मजल्यावरील ग्रीलमधून पडला अडीच वर्षांचा मुलगा अन्...

Maharastra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाला खिंडार; दोन बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश

MSRTC: रील्स, लाईव्ह स्ट्रीमिंग...; गणवेशात व्हिडिओ बनवण्यास बंदी, ST कर्मचाऱ्यांसाठी नवे नियम लागू

SCROLL FOR NEXT