Narendra Modi condolences to Shinzo Abe Saam Tv
देश विदेश

Shinzo Abe News : शिंजो आबेंच्या निधनानं PM नरेंद्र मोदी स्तब्ध, देशात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

भारतात उद्या एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे, कारण...

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली: जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मृत्यूबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आमच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या शिंजो आबे यांच्या निधनानं स्तब्ध आणि दुःखी झालो आहे. ते एक महान वैश्विक नेते, उल्लेखनीय प्रशासक होते. त्यांनी जपान आणि विश्वाला एक उत्तम स्थान मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले, अशा शब्दांत मोदी यांनी आबे यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच उद्या म्हणजेच ९ जुलै रोजी देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले, की 'शिंजो आबे यांच्यासोबत माझा अनेक वर्षांपासूनचा स्नेह होता. गुजरातचा मुख्यमंत्री असल्यापासून माझा आणि त्यांचा परिचय होता. पंतप्रधान झाल्यानंतर आमची मैत्री पुढेही कायम राहिली. अर्थव्यवस्था आणि जागतिक घडामोडींविषयीच्या त्यांच्या दृष्टीकोनाने माझ्यावर कायमच प्रभाव राहिला. अलीकडेच जपान दौऱ्यावेळी शिंजो आबे (Shinzo Abe) यांची भेट घेण्याची, तसेच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मला संधी मिळाली होती. ती माझी अखेरची भेट ठरेल हे माझ्या ध्यानीमनीही नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि जपानी नागरिकांबद्दल मी सहवेदना व्यक्त करतो.'

भारतात उद्या एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

शिंजो आबे यांनी भारत-जपान या दोन देशांमधील संबंध वैश्विक पातळीवर वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे. आज संपूर्ण देश (India) जपानच्या दुःखात सहभागी आहे. शिंजो आबे यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी उद्या, ९ जुलै रोजी देशात एका दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शिंजो आबे हे शुक्रवारी पश्चिम भागात निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करत असतानाच, त्यांच्यावर हल्लेखोरानं गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT