Crime News Yandex
देश विदेश

AAP Leader Shot Dead : हरियाणानंतर पंजाब हादरलं! आप नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या, रेल्वे फाटकाजवळ गोळीबार

AAP Leader Shot Dead in Punjab : हरियाणानंतर आता पंजाबही गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. पंजाबमध्ये आप नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Gangurde

AAP Leader Gurpreet Singh Shot Dead In Tarn Taran :

हरियाणानंतर आता पंजाबही गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. पंजाबमध्ये आप नेत्याची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबमधील गोइंदवाल साहिब रोड रेल्वे फाटकाजवळ ही घटना घडली आहे. गुरप्रीत सिंह असं या आप नेत्याचं नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील गोइंदवाल साहिब रोड रेल्वे फाटकाजवळ कारमधील गुरप्रीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गुरप्रीत यांना एका केस प्रकरणी कोर्टात हजर करण्यात येत होते. गेल्या काही दिवसांतील दुसरी घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी नफे स‍िंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गुरप्रीत सिंह हे कारने गोइंदवाल साह‍िब रोडच्या दिशेने चालले होते. गुरप्रीत सिंह हे फतेहाबाद रेल्वे क्रॉस‍िंग करताना फाटकाजवळ थांबला होते. ते कारमध्ये रेल्वे फाटक उघडण्याची वाट पाहत होते. त्याचवेळी अज्ञात लोकांनी त्यांच्यावर कारवर गोळीबार केला.

अज्ञात गोळीबार करणारेही लोकही कारमध्ये होते. त्यांनी गुरप्रीत सिंह यांच्या कारचा पाठलाग करून अज्ञातांनी गोळीबार केला. अज्ञातांनी गुरप्रीत सिंह यांच्यावर अंधाधुद गोळीबार केला. या घटनेत गुरप्रीत सिंह यांचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी गोळीबार घटनास्थळावरून पळ काढला. या पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT