Aap Vs Congress Saam T
देश विदेश

Delhi Politics: दिल्ली लोकसभेसाठी 'आप'चा काँग्रेसला अल्टिमेटम; वेळीच निर्णय द्या नाहीतर..

Aap Vs Congress : आप आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून ओढताण सुरू आहे. यावरून आम आदमी पक्षाने जागा वाटपावरून काँग्रेसला अल्टिमेट दिलाय. काँग्रेला दिल्लीत फक्त एक जागा सोडण्यास आप तयार आहे. आपच्या प्रस्तावावर काँग्रेस तयार असेल तर त्यांनी वेळीच निर्णय द्यावा नाहीतर आम्ही उमेदवारांची घोषणा करू असं इशारा पक्षाकडून देण्यात आलाय.

Bharat Jadhav

Aap And Congress Seat Sharing :

येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकांची घोषणा केली जाईल. यापार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून या आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसत आहे. एक एक करून राजकीय पक्ष आपली वेगळी चूल मांडत आहे. (Latest News)

ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जयंत राऊत यांनी 'इंडिया' आघाडीपासून वेगळं होत वेगळी चूल मांडलीय. आता पंतप्रधान मोदींचे कट्टर विरोधक अरविंद केजरीवाल हेदेखील इंडिया आघाडीतून वेगळं होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटपावरून ओढताण सुरू आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला एक जागा देऊ असं आपकडून सांगण्यात आले आहे. आम आदमी पक्ष दिल्लीतील ६ लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवेल तर काँग्रेसला एक जागा देऊ असं आपचे नेते संदीप पाठक यांनी माध्यमांना सांगितले आहे. जागांविषयी निर्णय देताना संदीप पाठक यांनी काँग्रेसला अल्टिमेटदेखील दिलंय.

आपकडून देण्यात आलेला प्रस्ताव काँग्रेसला मान्य असेल तर त्यांनी वेळेआधीच निर्णय द्यावा. नाहीतर आम्ही दिल्ली लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा करू असं पाठक यांनी स्पष्टपणे म्हटलंय. िल्ली आणि पंजाबमध्ये इंडिया आघाडीत बिघाडी सुरू असतानाच संदीप पाठक यांचे हे विधान आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पंजाबमधील तरनतारन येथे एका रॅलीला संबोधित करताना दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी जागावाटपाबाबत मोठे विधान केलं होतं. आपने सर्व सात जागांवर निवडणूक लढवावी अशी जनतेची इच्छा आहे , असं केजरीवाल म्हणाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chochlate Smoothie Recipe: फायदेशीर आणि स्वादिष्ट चॉकलेट मखाना स्मूदी, वजन कमी करण्यासाठी परफेक्ट, वाचा सोपी रेसिपी

Dussehra 2025: नवरात्रीत उगवलेल्या जवपासून करा दसऱ्याची पूजा, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या

Accident News : पंक्चर कार बाजूला घेताना वाहनाची धडक; दोघांचा जागीच मृत्यू, समृद्धी महामार्गावरील भीषण दुर्घटना

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Ladki Bahin Yojana: लाडकीची e KYC करण्याचा निर्णय का घेतला? कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT