a shivsainik from satara reached at hotel radisson blu for convince Rebel shivsena mla eknath shinde
a shivsainik from satara reached at hotel radisson blu for convince Rebel shivsena mla eknath shinde संजय डाफ
देश विदेश

"भाई मातोश्रीवर परत चला!" साताऱ्याचा शिवसैनिक पोहोचला थेट शिंदे थांबलेल्या हॉटेलबाहेर

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

मुंबई: कट्टर शिवसैनिक असणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेना अक्षरशः ढासळली आहे. महाविकास आघाडी सरकारही कोसळण्याच्या वाटेवर आहे. याबाबत अनेकजण एकनाथ शिंदेंवर टीका करतायत तर काही जण त्यांचं समर्थनही करतायत. या सगळ्यात एकनाथ शिंदे यांना परत आणण्यासाठी एका शिवसैनिक थेट गुवाहाटीत पोहोचलाय. साताऱ्याचा हा शिवसैनिक एकनाथ शिंदे ज्या रेडिसन ब्ल्यू हॉटेलात थांबले आहेत, त्याच हॉटेलबाहेर हा साताऱ्याचा शिवसैनिक पोहोचला आहे. "साहेब मातोश्रीवर परत चला" अशी आर्त साद त्याने एकनाथ शिंदेंना घातली आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

साताऱ्याच्या या शिवसैनिकाचं नाव अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र या शिवसैनिकानं आपल्या गळ्यात एक पाटी लावली आहे. यावर त्यानं एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन केलं आहे. यावर लिहीलंयं की, "शिवनसेना जिंदाबाद! एकनाथ शिंदे (भाई) मातोश्रीवर परत चला, उद्धवजी आणि आदित्यजींना साथ द्या" असा मजकूर यावर लिहीलेला आहे. यात त्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना साथ देण्याचं भावनिक आवाहन एकनाथ शिंदेंना केलं आहे. दरम्यान हॉटेलबाहेर उभा असलेल्या या शिवसैनिकाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शिवसेनविरोधात आणि महाविकास आघाडीविरोधात बंड करणारे नेते एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीत आहेत. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार त्यांच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. राज्यातल्या या राजकीय रणधूमाळीत शिवसेनेला सर्वात जास्त हाणी पोहोचल्याचं सध्या दिसतंयं. याच पार्श्वभूमीवर या एका सामान्य शिवसैनिकाने एकनाथ शिंदेंना भावनिक आवाहन केलं आहे.

दरम्यान आपला गट हाच शिवसेना विधिमंडळ पक्ष असल्याचा दावा शिंदेंकडून करण्यात आल्यामुळे आता सेनेत फूट पडली असून उद्धव ठाकरे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र, शिंदे यांच्या गटामध्ये सामील होणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा ते करत आहेत. त्यामुळे आता खरी शिवसेना कोणती आणि समर्थन कोणाचं करयाचं असा प्रश्न सामान्य शिवसैनिकांसमोर उपस्थित झाला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: धक्कादायक! फी न भरल्याने हजारो विद्यार्थ्यांचा निकाल ठेवला राखून; पुणे महापालिकेचा भोंगळ कारभार

पंढरपूर : नीरेच्या पाण्यासाठी 9 गावांतील शेतकरी आक्रमक, भाजपला दिला थेट इशारा

Husband Wife Case: पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध बलात्कार म्हणता येणार नाही; हायकोर्टाचं मत

Relationship Tips: योग्य वयात लग्न न केल्याचे तोटे जाणून घ्या

Today's Marathi News Live : अखेर काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर

SCROLL FOR NEXT