Viral Video
Viral Video Saam TV
देश विदेश

Viral Video: महिलेची नक्कल करत चार पायांवर थिरकली म्हैस; पाहा व्हिडीओ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) अनेक मजेदार आपला विश्वास बसणार नाही, असे आश्चर्यकारक तर कधी धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्याच्या या डिजिटल युगात आपणाला अनेक प्राण्यांच्या अदा देखील आपल्या मोबाईलमध्ये कैद करता येतात.

त्यामुळे आपण कधीही न पाहिलेल्या आणि दुर्मिळ असणाऱ्या अनेक गोष्टी पाहण्यात येत असतात. सध्या असाच एक प्रकार कॅमेऱ्यात कैद झारला असून त्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या व्हिडीओमध्ये चक्क एक म्हैस नाचताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ -

आजपर्यंत आपण घोडा नाचलेलं पाहिलं होतं. मात्र, चक्क म्हैस नाचते हे ऐकून थोडं नवलं वाटेल. मात्र हे सत्य आहे. व्हिडीओमधील म्हशीचा (Buffalo) डान्स पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. कारण ही म्हैस तिच्यासमोर उभी असणारी महिला ज्याप्रमाणे नाचत आहे. अगदी त्याचप्रमाणे ती नाचताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक म्हैस उभी राहून चारा खात आहे. तेवढ्यात समोर उभी असलेली एक स्त्री नाचू लागते. त्या महिलेला पाहताच म्हैस तिची नक्कल करू लागते आणि चारही पाय उचलून नाचताना दिसत आहे.

शिवाय समोर असणारी स्त्री ज्याप्रमाणे नाचत आहे त्याच प्रमाणे ही म्हैस देखील नाचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ खूप मजेशीर असून तो खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या म्हशीचा डान्स अनेकांना आवडला आहे तशा काही कमेंट्स देखील लोक इंन्स्टाग्रामवरती (Instagram) देत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra HSC result 2024 : राज्यातील बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींची बाजी; ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

Pune Hit & Run News | पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी आरोपीच्या वडिलांना अटक

Today's Marathi News Live : रेल्वेच्या धडकेत तीन चितळांचा मृत्यू, चंद्रपुरातील घटना

Buldhana Crime : संशयाचं भूत मानगुटीवर! बायकोची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; नवऱ्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

International Tea Day: जगभरात आंतरराष्ट्रीय चहा दिन का साजरा केला जातो? काय आहे इतिहास

SCROLL FOR NEXT