Corona Cases Update in Maharashtra| Covid Restriction Updates Saam TV
देश विदेश

Corona Cases Today: दिलासादायक! गेल्या 24 तासात 913 नवे कोरोनाबाधित रुग्ण; 13 मृत्यू

देशात कोरोनाचा संसर्गात मोठी घट झाली आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: देशात कोरोनाचा संसर्गात मोठी घट झाली आहे. देशात गेल्या २४ तासामध्ये ९१३ नवे कोरोनाबाधित (Corona) रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. काल १०९६ नवीन रुग्ण आणि ८१ जणांचा मृत्यू झाला. सक्रिय रुग्णांची संख्या १२,५९७ वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी दिवसभरामध्ये देशामध्ये १ हजार ३१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यानंतर देशात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ५९७ झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख हजार ८२१ झाली आहे.

हे देखील पहा-

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गुरुवारी दिवसभरामध्ये देशात १ हजार ९१८ लोक बरे झाले होते. देशात सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ६७२ झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार १८१ झाली आहे. देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ९० हजार ९२२ लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

देशामध्ये आतापर्यंत ४ कोटी ३० लाख २५ हजार ७७५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत १८४ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १८४ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी दिवसभरामध्ये २३ लाख ५७ हजार ९१७ डोस देण्यात आले आहेत.

देशामध्ये आतापर्यंत १८४ कोटी ३१ लाख ८९ हजार ३७७ डोस लसीचे देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटींपेक्षा जास्त कोरोना लसी देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT