tomato flu Saam TV
देश विदेश

सावधान! टोमॅटो फ्लूची भारतात एन्ट्री; आतापर्यंत ८० मुलं बाधित, ही लक्षणे दिसताच सावध व्हा

सुरूवातीला कोरोना व्हायरस, त्यानंतर मंकीपॉक्स आणि आता टोमॅटो फ्लूचा धोका वाढला आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवी दिल्ली : सुरूवातीला कोरोना व्हायरस, त्यानंतर मंकीपॉक्स आणि आता टोमॅटो फ्लूचा धोका वाढला आहे. भारतात आतापर्यंत टोमॅटो फ्लूची तब्बल ८० संशयित रुग्ण आढळून आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामधील बरीच संशयित रुग्ण ५ वर्षाखालील मुलं आहेत. या फ्लूने मुलांच्या शरीरावर वेदनादायक फोड तयार होतात. द सन मधील एका अहवालानुसार, टोमॅटो फ्लूचे नाव संपूर्ण शरीरात उद्भवणाऱ्या लाल आणि वेदनादायक फोडांवरून ठेवण्यात आले आहे, जे हळूहळू टोमॅटोच्या आकारात वाढतात.

टोमॅटो फ्लूची लक्षणे कोणती?

टोमॅटो फ्लूमुळे त्वचेवर पुरळ उठतात, ज्यामुळे रुग्ण त्वचेवर जळजळ होण्याची तक्रार करतात. लक्षणांमध्ये थकवा, मळमळ, उलट्या, अतिसार, ताप, निर्जलीकरण, सांधे सूज, शरीर दुखणे आणि सामान्य इन्फ्लूएंझा सारखी लक्षणे यांचा समावेश होतो.

डॉक्टरांनी फोडांच्या पुरळांची तुलना मंकीपॉक्स आणि तापाच्या लक्षणांची डेंग्यू, चिकनगुनिया आणि हात, पाय आणि तोंडाच्या आजाराशी केली आहे. शरीरावर ही लक्षणे कशामुळे दिसतात हे शोधण्याचा संशोधक अजूनही प्रयत्न करत आहेत.

सर्व प्रकरणांमध्ये मुले

आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात आत्तापर्यंत मे ते जुलै महिन्यादरम्यान, टोमॅटो फ्लूची तब्बल ८२ प्रकरणं नोंदवण्यात आली. यामध्ये ५ वर्षाखालील बऱ्याच मुलांचा समावेश आहे. केरळच्या कोल्लम जिल्ह्यात टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आला होता, त्यानंतर तो संपूर्ण प्रदेशात पसरला.

टोमॅटो फ्लू हा आजार गंभीर किंवा जीवघेणा आहे याचा कोणताही पुरावा नाही. मात्र असं असलं तरी, संक्रमित झालेल्या मुलांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तज्ञांच्या मते, लक्षणे दिसू लागल्यावर मुलांना ७ दिवस क्वारंटाईन करावे. हा फ्लू प्रौढांनाही संक्रमित करू शकतो.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार! महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आश्वासन

Housing Society : फ्लॅटधारकांसाठी मोठी बातमी! आता ३ वर्षांत पुनर्विकास पूर्ण करावाच लागणार; नवीन नियम लागू

Tyres Black Colour : वाहनांचे रंग आणि डिझाइन बदलते, मग टायर नेहमी काळ्या रंगाचेच का असतात? जाणून घ्या रंजक कारण

महायुतीत बंडखोरी? सामंतांच्या निकटवर्तीय नेत्यानं थोपटले दंड; शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का

Monday Horoscope : पैसा, करिअर आणि व्यवसायात मोठी संधी; ‘या’ 6 राशींचे नशीब उजळणार

SCROLL FOR NEXT