uttarakhand Accident news/Photo : ANI  saam tv
देश विदेश

Uttarakhand Accident: अंत्यविधीवरून घरी परतताना भीषण अपघात; खोल दरीत जीप कोसळून ८ जणांचा मृत्यू

Uttarakhand Accident News : उत्तराखंडच्या टिहरी गढवालमध्ये चंबा कोटी कॉलनी रोडवर प्रवाशांनी भरलेलं वाहन खोल दरीत कोसळलं. या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

uttarakhand accident tehri garhwal vehicle falls gorge 8 dead : उत्तराखंड येथील टिहरीमध्ये चंबा-कोटी कॉलनी मार्गावर नैलजवळ प्रवाशांनी भरलेलं वाहन थेट दरीत कोसळलं. या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बृजेश भट्ट यांनी आठ जणांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांनी लगेच बचावकार्य हाती घेतले. या अपघातात मृत्युमुखी पडलेले प्रवासी हे घनसाली परिसरातील चांजी, ठेला आणि चकरेडा गावातील रहिवासी होते. ते सर्व जण एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी हरिद्वारला गेले होते. तिथून परतत असताना ही दुर्घटना घडली.

अपघातग्रस्त वाहनात एकूण १० प्रवासी असल्याची माहिती आहे. इतर दोघे जखमी आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. चंबा पोलीस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ बचावकार्य हाती घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण साडेतीन वाजता ही दुर्घटना घडली. सर्व जण एका नातेवाईकाच्या अंत्यसंस्काराला गेले होते. अंत्यविधी उरकल्यानंतर ते घरी परतत असताना अपघात झाला.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व नागरिक हे घनसाली विभागातील चांजी, ठेला आणि चकरेडा गावातील रहिवासी होते. हरिद्वारमध्ये ते एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले होते. गावी परतताना त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या घटनेनंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुःख व्यक्त केले. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना उत्तम उपचार देण्यात यावेत, अशी व्यवस्था करावी, असे निर्देश संबंधित जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माजी मुख्यमंत्र्यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

रेकॉर्डब्रेक मतदान! पश्चिम बंगालमध्ये ९० टक्के व्होटिंग; सत्ता बदलणार की ममता बॅनर्जी पुन्हा येणार?

Baramati Politics: 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार लढत होणार? रोहित पवारांच्या विधानावर जय पवारांचं स्पष्ट शब्दात उत्तर

मनातल्या इच्छा अपूर्ण राहतील, विवाहित लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतील; ५ राशींच्या लोकांसाठी शुक्रवार ठरणार आव्हानात्मक

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये जनावरांच्या गोट्याला भीषण आग, सात जनावरांसह शेती उपयोगी साहित्य जळून खाक

SCROLL FOR NEXT