Corona Virus Quarantine News  Saam Tv
देश विदेश

Coronavirus : एकाच्या चुकीमुळे ५ हजार लोकं क्वारंटाईन; कोरानाची दहशत कायम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीजिंग : चीनची (China) राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) एका व्यक्तीने कोरोनाचे नियम (Corona Rules) मोडल्याने आणि हजारो लोकांना क्वारंटाईन (Quarantine) करण्यास भाग पाडले. नंतर तो स्वतः कोरोना (Coronavirus) पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. कोविडची वाढती प्रकरणे पाहता, बीजिंगमधील लोकांना गेल्या पाच आठवड्यांपासून घरी राहण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी सन नावाच्या ४० वर्षीय व्यक्तीने कोरोनाचे नियम मोडल्याचे आढळून आले आणि तो शॉपिंग सेंटरबाहेर फिरताना आढळला. (5,000 people quarantined for one person's mistake; Corona terror persists in china)

हे देखील पाहा -

५००० शेजाऱ्यांना व्हावं लागलं क्वारंटाईन

बीजिंगच्या सार्वजनिक सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की सन नावाचा ४० वर्षांचा व्यक्ती त्याच्या होम क्वारंटाईनच्या काळात तो अनेक वेळा बाहेर गेला आणि शेजारच्या परिसरात फिरला. नंतर कोरोना चाचणीत तो पुरुष आणि त्याची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यानंतर ५ हजार शेजाऱ्यांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला. तर २५० जणांना शासकीय विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले.

नियम मोडणाऱ्यांवर होऊ शकते कठोर कारवाई

खरं तर, सोमवारी बीजिंगमध्ये कोरोनाचे निर्बंध कमी करण्यात आले. याअंतर्गत उद्याने, संग्रहालये आणि सिनेमागृहे पुन्हा सुरू करण्यात आली. सध्या चीन लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करत आहे आणि शून्य कोविड धोरणाखाली काम करत आहे. कोरोनाचे नियम मोडल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई होऊ शकते, त्याची पोलिस चौकशी सुरू आहे.

कोविडचे रुग्ण कमी होऊ लागले

बीजिंगमध्ये एप्रिलच्या अखेरीपासून १७०० हून अधिक संसर्गाची प्रकरणे आढळली आहेत. गेल्या आठवडाभरात या प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. बीजिंग सरकारचे प्रवक्ते जू हेजियान यांनी रविवारी सांगितले की, दोन दिवसांपासून एकही नवीन रुग्ण आढळला नाही. गोष्टी स्थिर आहेत आणि सुधारत आहेत, परंतु कोरोनाचा धोका अजूनही आहे.

अनेक अत्यावश्यक सेवा पुन्हा सुरू झाल्या

राजधानी बीजिंगच्या तीन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये सोमवारी बहुतेक बस, मेट्रो आणि टॅक्सी सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आणि लाखो लोकांना कामावर परतण्यास सांगितले गेले. चीनचे व्यावसायिक केंद्र शांघायनेही सोमवारी आणखी काही निर्बंध उठवण्याची घोषणा केली.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

Video : ''कोणाला खुमखुमी असेल तर..'', राऊतांचा कॉंग्रेस नेत्यांना थेट इशारा

Vasant More : वसंत मोरे विधानसभेच्या मैदानात, पुण्यातील 'या' मतदारसंघातून निवडणूक लढवणार? भाजपचं टेन्शन वाढणार

SCROLL FOR NEXT