4 State Assembly Election Saam Digital
देश विदेश

4 State Assembly Election : लोकभेसोबतच निवडणुका अन् ४ जून रोजीच निकाल; चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं

4 State Assembly Election Date : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकांसोबत अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या निवडणुकांच्या तारखां जाहीर केल्या. लोकसभा निवडणुकांसोबतच या राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.

Sandeep Gawade

4 State Assembly Election

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकांसोबत अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश या चार राज्यांच्या निवडणुकांच्या तारखां जाहीर केल्या. लोकसभा निवडणुकांसोबतच या राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत आणि ४ जून रोजीच निकाल लागणार आहे. अरुणाचल प्रदेशातील 60 मतदारसंघ आणि सिक्कीमच्या 30 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

ओडिशातील विधानसभेच्या जागांसाठी 13 मे ते 1 जून दरम्यान चार टप्प्यांत मतदान होणार आहे. मतदानाची पहिली फेरी लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात होईल, असं निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहीर केलं. राज्यात १३ मे, २० मे (पाचवा टप्पा), २५ मे (६वा टप्पा) आणि १ जून (७वा टप्पा) अशा चार टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशच्या 175 विधानसभा जागांसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. चारही राज्यांतील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.

भारतीय निवडणूक आयोग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या. दोन्ही नवीन निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारताच निवडणूक आयोगाने चार राज्यांच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक (Lok Sabha Election 2024 Schedule) जाहीर केले. देशातील ७ टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच देशात आदर्श आचारसंहिताही लागू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

SCROLL FOR NEXT