Rajasthan IAS and IPS officers ready to oversee 2026 assembly elections across India. Saam Tv
देश विदेश

३७ IAS-IPS अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी; कोणाला कोणता पदभार मिळाला?

37 IAS-IPS Officers Appointed As Election Observers: केंद्रीय निवडणूक आयोगाने 2026 च्या विधानसभा निवडणुकांसाठी राजस्थानमधील 37 आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

Omkar Sonawane

केंद्रीय निवडणूक आयोग आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुदुचेरी येथील 2026 च्या विधानसभा निवडणुका, तसेच विविध राज्यांमधील पोटनिवडणुकांच्या तयारीच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या लोकशाहीच्या उत्सवासाठी देशभरात 1,111 केंद्रीय निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत राजस्थानने महत्त्वाची भूमिका बजावली असून, या राज्यातील 37 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर 'निवडणूक निरीक्षक' म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आयएएस (IAS) अधिकऱ्यांचे पथक: राजस्थानमधून 28 आयएएस आणि 9 आयपीएस अधिकाऱ्यांची निवड झाली. राजस्थान केडरच्या प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत, निवडणूक आयोगाने राज्यातून एकूण 37 अधिकाऱ्यांची निवड केली आहे. राजस्थानमधील २८ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्यांची 'सर्वसाधारण निरीक्षक' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते निवडणूक प्रक्रियेचे कार्यक्षम व्यवस्थापन आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष ठेवतील.

आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांचे पथक: 9 (आयपीएस) अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक म्हणून तैनात करण्यात आले आहे. ज्यांचे मुख्य काम संवेदनशील मतदान केंद्रांवर कोणीही हैदोस घालू नये आणि हिंसाचारमुक्त निवडणुका पार पाडणे हे आहे.

राजस्थान केडरच्या अधिकाऱ्यांचा निष्पक्ष निवडणुका घेण्याचा उत्कृष्ट अनुभव आहे. कठीण भौगोलिक परिस्थिती आणि राजकीय आव्हाने असूनही शांततापूर्ण निवडणुका घेण्याचा त्यांचा अनुभव आता पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये उपयोगी पडेल. निवडणुकांमध्ये पैशाच्या शक्तीचा गैरवापर होऊ नये, हे निरीक्षकही तैनात करण्यात आले आहेत. असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काही तरी मोठं घडणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या विरोधात हादरवणारी पोस्ट, जगात खळबळ

NEET paper leak: 'मनी'साठी मनिषांनी फोडला पेपर, पुण्यातील 3 मनिषांचा कारनामा उघड

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

SCROLL FOR NEXT