Bihar Aurangabad LPG Cylinder Blast Saam TV
देश विदेश

Bihar News : बिहारच्या औरंगाबादेत मोठी दुर्घटना; सिलेंडरच्या स्फोटात ३० जण होरपळले

छट पुजेचा प्रसाद बनवत असताना अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात ३० हून अधिकजण होरपळले असल्याची माहिती आहे.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : बिहारच्या औरंगाबाद (Aurangabad) शहरात एक भंयकर घटना घडली. छट पुजेचा प्रसाद बनवत असताना अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात ३० हून अधिकजण होरपळले असल्याची माहिती आहे. सर्व जखमींना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

प्राप्त माहितीनुसार, बिहारच्या औरंगाबाद शहरातील शहागंज परिसरातील एका घरात छट पुजेचा प्रसाद बनवण्याचे काम सुरू होते. महिला प्रसाद बनवत असताना अचानक सिलेंडरमधून गॅस (LPG Cylinder) गळती होऊन आग लागली. आगीची माहिती मिळताच परिसरातील काही लोकांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच, पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिस कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र यादरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला, या स्फोटात 30 हून अधिकजण होरपळले असल्याची माहिती आहे. यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, स्फोटातील जखमींवर सध्या सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, यापैकी १० जणांना चांगल्या उपचारांसाठी रेफर करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सामान्य आहे. त्याचबरोबर अशा प्रसंगी सावध राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, सावधगिरी बाळगल्यास जाळपोळीचा धोका टाळता येईल, असे सांगितले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT