वृत्तसंस्था : दिवाळीच्या Diwali चांगल्या दिवशीच एक वाईट बातमी घडली आहे. दिवाळीच्या सणाला आई- वडिल आपल्या मुलांसाठी विविध प्रकारचे फटाके घेत असतात आणि त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही पालक फटाके वाजवण्याकरिता मुलांना एकटे सोडतात आणि त्यानंतर त्यात कधी गंभीर अपघात देखील होत असतात. गुजरातच्या Gujarat सुरतमध्ये Surat अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे.
सुरतच्या डिंडोलीमध्ये ३ वर्षांच्या मुलानं पॉप- अप फटाके खाल्ल्याची घटना घडली आहे. अतिसार आणि उलट्यांचा त्रास होऊन, मुलाची प्रकृती गंभीर झाली होती. त्यानंतर त्याला उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले होते. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. पालकांना सावध करणाऱ्या या प्रकरणाबाबत बोलताना त्याच्या वडिलांनी सुरतच्या डिंडोली या ठिकाणी आपल्या ३ वर्षाच्या मुलासाठी फटाके आणले होते.
हे देखील पहा-
मूल लहान असल्यामुळे हे फटाके फोडून झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते. यानंतर मुलाने फटाखा गिळला आहे. त्यानंतर तो आजारी पडला आणि बरा झाला नाही. अतिसार आणि उलट्यामुळे पॉप- अप फटाके फुटल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. जिथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले आहे. आणि मुलाने फटाके खाल्ल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या बरोबरच सर्व पालकांनी दिवाळीच्या फटाक्यांपासून आपल्या मुलांना सांभाळून आणि सावध राहण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. पोटामधून फटाका निघाल्याने एका चिमुरड्या मुलाच्या पोटामधून फटाका काढल्यानंतर त्याला मृत घोषित केल्यामुळे डॉक्टरांनाही वाईट वाटत आहे, आणि त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याकरिता डॉक्टरांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
बिहारचे रहिवासी असलेले राज शर्मा हे सुतारकाम करत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांनी पहिल्यांदाच मुलांसाठी फटाके आणले होते. मात्र, मुलाने फटाका केव्हा खाल्ला हे समजले नाही. अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आल्यावर डॉक्टरांनी लोकांना सतर्क राहण्याचा मेसेज दिला आहे. राज शर्मा यांनी सांगितले की, ते कुटुंबासह ८ महिन्याअगोदर बिहारहून सुरतला आले होते.
राज शर्मा यांचा पत्नी, ३ वर्षांचा मोठा मुलगा शौर्य आणि २ वर्षांची मुलगी असा परिवार आहे. २४ तासांपासून शौर्य अचानक आजारी पडल्यामुळे त्यांना त्याची काळजी वाटत होती. त्याला उपचारासाठी जवळच्या डॉक्टराना दाखवण्यात आले होते. अचानक मुलाला उलट्या होऊ लागल्याने, त्याला पुन्हा डॉक्टरांकडे पाठविण्यात आले होते. यावर डॉक्टरांनी त्याला ड्रिप लावून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी शौर्यला मृत घोषित केले आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.