3 Soldiers Martyred in Machil Sector ANI
देश विदेश

3 Soldiers Martyred : गस्तीवर असताना LOCजवळ लष्कराचे जवान खोल दरीत कोसळले; ३ शहीद

3 Soldiers Martyred In Kupwara : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडातील माछिल सेक्टरमध्ये भारतीय लष्कराचे ३ जवान शहीद झाले.

Nandkumar Joshi

3 Soldiers Martyred in Machil Sector : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा (Kupwara) जिल्ह्यातील माछिल सेक्टर येथे नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना भारतीय लष्करातील ३ जवान खोल दरीत कोसळले. या दुर्घटनेत तिन्ही जवान शहीद झाले. तिघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत.

ANIच्या वृत्तानुसार, कुपवाडा जिल्ह्यातील माछिल सेक्टरमध्ये LOC जवळ गस्तीवर असताना तीन जवान खोल दरीत कोसळले. या घटनेत तिघेही जवान शहीद झाले. शहीद झालेल्यांमध्ये १ जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) आणि दोन ओआर आहेत. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तो भाग बर्फाळ आहे.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सकडून दिलेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना एक ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर आणि दोन ओआर (अन्य रँक) यांचा समावेश असलेल्या पथकावर बर्फ कोसळला. पथकातील तिनही जवान खोल दरीत कोसळले. यात ते शहीद झाले. तिघा जवानांचे पार्थिव दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

एएनआयने दिलेल्या ट्विटनुसार, नायब सुभेदार परषोतम कुमार, हवालदार अम्रिक सिंह, शिपाई अमित शर्मा अशी माछिल सेक्टरमध्ये शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.

नोव्हेंबरमध्येही घडली होती दुर्घटना

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही कुपवाडा येथील माछिल सेक्टरमध्ये अशीच दुर्घटना घडली होती. हिमस्खलनात तीन जवान शहीद झाले होते. अल्मोडा चौकीजवळ हिमस्खलनात ५६ आरआरचे तीन जवान कर्तव्यावर असताना शहीद झाले, अशी माहिती कुपवाडा पोलिसांकडून देण्यात आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT