देश विदेश

3 People Dead After Eating Mushroom: मशरूम खाल्ल्याने तिघांचा मृत्यू, 4 जणांची प्रकृती गंभीर; नेमकं काय घडलं?

Australia Crime News: ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून (Australia Police) सुरु आहे.

Priya More

Australia News: मशरूम (Mushroom) खाल्ल्याने एका कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यामध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून (Australia Police) सुरु आहे. नेमकं काय घडलं यामागचं कारण पोलीस शोधत आहेत. व्हिक्टोरिया पोलिसांकडून या धक्कादायक घटनेचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिक्टोरिया राज्यातील लियोनगाथा शहरामध्ये ही घटना घडली आहे. २९ जुलैला ही घटना घडली आहे. एक कुटुंब आपल्या नातेवाईकांच्या घरी जेवणासाठी गेले होते. जेवणामध्ये मशरूमची भाजी बनवण्यात आली होती. सर्वांनी एकत्र जेवण केलं. त्यानंतर अनेकांची प्रकृती बिघडली. यामधील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चौघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

याप्रकरणाचा तपास ऑस्ट्रेलिया पोलिसांकडून सुरु आहे. मशरूमची भाजी तयार करणाऱ्या महिलेची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ही मशरूमची भाजी खाऊन इतर सर्वांची प्रकृती बिघडली. मात्र या महिलेला काहीच झाले नाही. त्यामुळे या महिलेवर संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमध्ये महिलेला संशयित समजून पोलीस तिची चौकशी करत आहे. ही हत्या असू शकते? असा संशय देखील अनेकांनी व्यक्त केला आहे.

संशयित महिलेने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मला माहिती नाही की काय आणि कसं झालं? मी काहीच केलं नाही. मी त्यांच्यावर प्रेम करत होती. त्यांचा मृत्यू झाल्यामुळे मला खूपच दु:ख झालं आहे.' दरम्यान पोलीस चौकशीमध्ये महिलेने हे सांगण्यास नकार दिला आहे की, तिने २९ जुलैला कोणत्या व्यक्तीला जेवणामध्ये काय वाढलं होतं. तसंच ज्या मशरूमची भाजी तयार केली होती ते कुढून आणण्यात आले होते हे सांगण्यास देखील तिने नकार दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या लोकांनी कोणत्या प्रकारचे मशरूम खाल्ले होते हे अद्याप समजले नाही. पण त्याची लक्षणं डेथ कॅप जसं की प्राणघातक मशरूम सारखी होती. पण या घटनेमध्ये नेमकं काय घडलं आहे हे समोर यायला वेळ लागेल. पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरु आहे.'

महिलेने आपल्या पतीसह सासरच्या मंडळींना मशरूमची भाजी खायला दिली होती. गेल आणि डॉन पीटरसन आणि त्यांची बहीण हीथर विल्किंसन ही या महिलेच्या घरी जेवण करण्यासाठी आली होती. या तिघांचा मशरूम खाल्ल्यानंतर मृत्यू झाला. तर महिलेच्या पती इयान विल्किंसनची प्रकृती गंभीर असून गेल्या आठवड्याभरपासून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महिलेची मुलं देखील घरीच होती. पण त्यांनी ही मशरूमची भाजी खाली नाही. त्यामुळे ते बचावले. पोलिसांनी महिलेच्या घराची तपासणी करुन जेवणाचे काही पदार्थ जप्त केले असून त्याचा फॉरेन्सिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

SCROLL FOR NEXT